-
‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेले प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी नुकतीच त्यांच्या प्रेमाची कबुली दिली.
-
‘सा रे ग म प’नंतर त्यांनी अनेक गाण्याचे कार्यक्रम एकत्र केले आहेत आणि अजूनही करत आहेत. त्या व्यतिरिक्त अनेकदा ते दोघं एकत्र दिसतात. त्यामुळे ते दोघं एकमेकांना डेट करत आहेत असा अंदाज त्यांचा चाहत्यांना होता.
-
अखेर सोशल मीडियावर त्यांचा एक फोटो शेअर करत “आमचं ठरलं!” असं लिहित त्यांनी त्यांचं नातं जगासमोर आणलं.
-
सोशल मीडियावरून सर्वत्र त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या चाहत्यांबरोबरच मनोरंजनसृष्टीतील कलाकारांनीही त्यांच्या पोस्टवर कमेंट करत त्यांचं अभिनंदन केलं आहे.
-
दरम्यान, एका मुलाखतीत बोलताना त्या दोघांनी त्यांची लव्हस्टोरी कशी सुरु झाली हे सांगितलं.
-
सारेगमप लिटिल चॅम्प्समुळे त्यांची ओळख झाली आणि त्यानंतर त्यांचे एकत्र गाण्याचे कार्यक्रम सुरु झाले.
-
कार्यक्रमांमुळे त्यांचं भेटणं व्हायचं आणि त्या दरम्यानच त्या दोघांना एकमेकांविषयी भावना निर्माण झाल्या.
-
एकदा त्यांच्या कार्यक्रमाची तालीम सुरु होती. त्यामध्ये त्यांच्यात आवांतर गप्पाही होत होत्या. तेव्हा प्रथमेशने मुग्धाला विचारलं. तो तिला हे विचारणार हे तिला अपेक्षितच होतं.
-
मुग्धानेचं उत्तर काय असेल हे प्रथमेशला माहीत होतंच पण तरीही मुग्धाने त्याला होकार द्यायला तीन-चार दिवस लावले.
-
तिने एक दिवस त्याला भेटायला बोलावलं आणि त्याला होकार दिला. गेली साडेतीन – चार वर्षं ते एकमेकांना डेट करत आहेत.
-
प्रथमेश आणि मुग्धाच्या नात्याबद्दल त्यांच्या घरच्यांना अंदाज होताच. मुग्धाचं शिक्षण पूर्ण झाल्यावर घरी सांगायचं असं त्यांनी ठरवलं होतं.
-
पाच-सहा महिन्यांपूर्वी त्यांनी त्यांच्या नात्याविषयी त्यांच्या घरच्यांना सांगितलं.
-
त्या दोघांनी एकच दिवशी, एकाच वेळी त्यांच्या घरी त्यांच्या प्रेमाबद्दल सांगितलं. “जर आणखीन थोडा जरी उशीर केला असता तर आमच्या घरच्यांनीच पुढाकार घेऊन तुमचं काय चाललंय? असं विचारलं असतं,” असं मुग्धा म्हणाली.
-
तर “आम्ही एकमेकांच्या घरच्यांना लहानपणापासून ओळखतो. आमच्या नात्याबद्दल घरी सांगितल्यावर त्यांची प्रतिक्रिया अगदी साधी होती. निश्चितच त्यांना आनंद झाला. आता लवकरच पुढील गोष्टी ठरतील,” असं प्रथमेशने सांगितलं.
-
तर आता सर्वांचं लक्ष ते कधी लग्न करणार याकडे लागलं आहे

Daily Horoscope: हनुमान जयंतीला मारुतीराया कोणाला देणार बळ? राशीनुसार ‘ही’ कामं केल्यास तुमचाही दिवस ठरेल फायद्याचा