-
बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी अभिनयाबरोबरच दिग्दर्शन क्षेत्रातही हात आजमावून पाहिला आहे. यापैकी अनेक अभिनेत्यांचे चित्रपट सुपरहिट तर काहींचे चित्रपट फ्लॉपही ठरले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा कलाकारांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी अभिनयात ठसा उमटवल्यानंतर चित्रपट दिग्दर्शन क्षेत्रात हात आजमावला आहे.
-
अजय देवगण : अजयने ‘यू मी और हम’, ‘शिवाय’, ‘रनवे ३४’ आणि ‘भोला’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. (Source: Ajay Devgn/Facebook)
-
आमिर खान : आमिरने तारे जमीन पर या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. (Source: @amirkhanactor_/instagram)
-
अनुपम खेर : अनुपम खेर यांनी ‘ओम जय जगदीश’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. (Source: Anupam Kher/Facebook)
-
फरहान अख्तर : फरहान अख्तरने लक्ष्य, दिल चाहता हैं, डॉन, डॉन २ या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. हे सर्व चित्रपट सुपरहिट ठरले होते. (Source: Farhan Akhtar/Facebook)
-
नसीरुद्दीन शाह : ‘यूं होता तो क्या होता’ या नावाचा एक चित्रपट नसीरुद्दीन शाह यांनी दिग्दर्शित केला होता. (Source: Naseeruddin Shah/Facebook)
-
रजत कपूर : रजत कपूर यांनी ‘मिक्स डबल्स’, ‘मिथ्या’ आणि ‘आंखों देखी’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. (Still From Film)
-
नदिंता दास : नंदिता दास हिने फिराक, मंटो आणि झ्विगाटो या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. (PC :Nandita Das Instagram)
-
राकेश रोशन : राकेश रोशन यांनी खुदगर्ज, खूप भरी मांग, काला बाजार, करण अर्जुन, कोयला, कहो ना प्यार हैं, कोई मिल गया, क्रिश आणि क्रिश ३ या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. (PC : Rakesh Roshan Instagram)

Waqf Bill Controversy: “अलविदा नितीश कुमार..”, वक्फ विधेयक मंजूर होताच नितीश कुमारांच्या पक्षात बंडखोरी; नाराज नेत्यांचे राजीनामे