-
दिग्दर्शक ओम राऊत यांचा बहुचर्चित ‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जून २०२३ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.
-
रामायणावर आधारित असलेल्या ‘आदिपुरुष’मधील संवाद, व्हीएफएक्स, कलाकारांचे लुक पाहून सोशल मीडियावर चित्रपटाला ट्रोल केले जात आहे.
-
चित्रपटात रावण आणि सीतेचा लुक पाहून काही नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
-
आता आर्टिफिशियल इंटेलिजेंस अर्थात एआय( AI) च्या मदतीने साहिद नावाच्या डिजिटल क्रिएटरने ‘आदिपुरुष’मधील कलाकारांचा नवा लुक बनवला आहे.
-
‘आदिपुरुष’ चित्रपटातील कलाकारांचा AI लुक जुन्या रामानंद सागर यांच्या रामायणामधील पात्रांसारखा आहे.
-
साहिदचे कौशल्य पाहून नेटकरी त्याचे कौतुक करीत, “भाऊ आदिपुरुषसाठी काम केले पाहिजे होतेस, आमचे तिकिटाचे ५०० रुपये तरी वसूल झाले असते”, अशी कमेंट केली आहे.
-
दुसऱ्या एका युजरने, “ओम राऊतने तुझ्याकडून काहीतरी शिकले पाहिजे” अशी प्रतिक्रिया साहिदने शेअर केलेल्या AI च्या फोटोंवर दिली आहे.
-
चित्रपटाला मोठ्या प्रमाणात विरोध होत असल्याने आता हळूहळू ‘आदिपुरुष’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये घट होत आहे.
-
दरम्यान, चित्रपटात प्रभासने प्रभू श्रीराम यांची, क्रिती सेनॉनने माता सीतेची, सैफ अली खानने रावणाची व देवदत्त नागे याने हनुमानाची भूमिका साकारली आहे.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”