-
‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे काजल काटे.
-
या मालिकेत काजल काटेने ‘शेफाली’ हे पात्र साकारलं होतं. या पात्राने तिला लोकप्रियता मिळवून दिली.
-
काजल काटेचा आज वाढदिवस आहे.
-
काही महिन्यांपूर्वी काजलने कलाविश्वात करिअर करताना तिला सुरुवातीच्या काळात आलेल्या एका अनुभवाबद्दल भाष्य केले होते.
-
काजल ही ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात बोलताना तिने कास्टिंग काऊच आणि सिनेसृष्टीबद्दल भाष्य केले होते.
-
मुळची नागपूरची असलेल्या काजलला शोमधील महिलेने “कोणाला कधी नागपूरी मुलीचा इंगा दाखवला आहे का?”, असा प्रश्न विचारला होता.
-
त्यावर उत्तर देताना काजलने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगितले.
-
त्यावेळी एक प्रसंग शेअर करत ती म्हणाली, “मुंबईत करिअर करण्यासाठी आल्यानंतर मी एका ठिकाणी ऑडिशन द्यायला गेले होते.”
-
“त्या निर्माती कंपनीतील एका माणसाने मला डायरेक्ट तू कॉम्प्रोमाईझ करशील का?” असं विचारलं.
-
“हे ऐकल्यावर मी त्याच्या कानाखाली दिली.”
-
त्याला म्हणाले, “यापुढे असं कोणत्याही मुलीला विचारलं तर तुझी खैर नाही”.
-
“त्यावेळी रात्रीचे आठ वाजले होते.”
-
“मी एकटीच तिथे असल्यामुळे माझ्या एका मित्राला फोन करुन बोलवून घेतलं.”
-
“जर या माणसाने काही चुकीचं केलं तर माझा मित्र माझ्याबरोबर असेल.”
-
“तिथून निघाल्यानंतर मी घरी येऊन खूप रडले.”
-
“मी यापूर्वीही याबद्दल ऐकलं होतं. पण असं कोणी कसं काय विचारू शकतं, हे मला कळत नव्हतं” असे काजलने म्हटले होते.
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल