-
सारा अली खान आणि विकी कौशल यांच्या ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्यामुळे अभिनेत्री उज्जैनच्या महाकाल मंदिरात दर्शनासाठी गेली होती.
-
सारा अली खान उज्जैनच्या मंदिरात गुलाबी रंगाची साडी नेसून गेली होती.
-
अभिनेत्रीने शनिवारी महाकाल मंदिराच्या गर्भगृहात आरती केली.
-
जवळपास तासभर सुरु असलेल्या सगळ्या धार्मिक विधींमध्ये सारा उपस्थित होती.
-
साराने महाकाल मंदिरात पूजा केल्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलचे व्हायरल झाले आहेत.
-
व्हायरल फोटो-व्हिडीओ पाहून, नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा अभिनेत्रीला मंदिरात जाण्यावरून ट्रोल केले आहे.
-
एका युजरने “सारा उगाच ओव्हर अॅक्टिंग करतेय”, तर दुसऱ्या एका युजरने “प्रत्येक चित्रपटात धर्माचा अँगल जोडून चित्रपट हिट कसे करायचे हे बॉलीवूडकरांना चांगलेच माहितीये” अशा कमेंट अभिनेत्रीच्या फोटोंवर केल्या आहेत.
-
मंदिरात जाण्यावरून किंवा देवाची पूजा करण्यावरून सारा अली खान ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिला या मुद्द्यावरून ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.
-
दरम्यान, अभिनेत्रीचा ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपट जगभरात लवकरच १०० कोटींचा टप्पा गाठणार आहे. यामध्ये सारा अली खानबरोबर अभिनेता विकी कौशलने मुख्य भूमिका साकारली होती.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”