-
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचे देशातच नाही तर परदेशातही फॅन फॉलोअर्स आहेत. या किंग खानचे आज इंडस्ट्रीत ३१ वर्षे पूर्ण होत आहेत. ३१ वर्षांच्या कार्यकाळात त्याने जगभरातील चाहते तयार केले.
-
शाहरुख खानचे फिल्मी करिअर हिट ठरले आहे. तसेच, तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही यशस्वी आहे.गौरी आणि शाहरुख या जोडप्याला आर्यन, सुहाना आणि अबराम अशी तीन मुलं आहेत. बी-टाऊनमधील प्रत्येकजण या कपलच्या नात्याचे कौतुक करत आहे. त्याच्या आयुष्यात एक काळ असा होता जेव्हा किंग खानला गौरी गमावण्याची भीती वाटत होती.
-
१९९७ साली आर्यन खानचा जन्म झाला. तेव्हाच शाहरुख प्रसिद्धीच्या शिखरावर होता. परंतु, याच काळात त्याला एक मोठा धक्का बसला होता. एका मुलाखतीत त्यानेच याबाबत खुलासा केला होता.
-
आर्यन खानच्या वेळेस गौरीला प्रसुती कळा जाणवू लागल्या तेव्हा तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी तिची प्रकृती नाजूक होती. तिला वेगवेगळ्या सुई टोचण्यात आल्या होत्या. तसंच विविध वैद्यकीय उपकरणं लावण्यात आली होती. तिची सिझेरियन सुरू होते तेव्हा शाहरूख खानही ऑपरेशन थिएटरमध्ये होता. हे सर्व पाहून गौरीच्या प्रकृतीविषयी शाहरुखना चिंता वाटू लागली होती.
-
त्यावेळी शाहरुख खानने मुलाचा विचार केला नव्हता. मुलं जन्मताच मरत नाहीत हे त्याला माहीत होतं, पण तरीही तो थोडा घाबरला होता, एक मुलाखतीत त्याने हे सांगितलंहोतं.
-
शाहरुख आणि गौरी 1997 मध्ये आर्यनचे पालक झाले. यानंतर 2000 मध्ये त्यांच्या घरी मुलगी सुहानाचा जन्म झाला. इतकेच नाही तर गौरी आणि शाहरुख 2013 साली तिसऱ्यांदा पालक झाले. त्यावेळी गौरीने सरोगसीद्वारे मुलगा अबरामला जन्म दिला.
-
विशेष म्हणजे शाहरुख खान त्याची पत्नी गौरीला आपल्या करिअरची मोहिनी मानतो. दिल्लीत आल्यावर तो गौरीच्या प्रेमात वेडा झाला होता आणि प्रेमविवाह करून त्याने तिला आपलेसे केले होते. गौरीशी लग्न झाल्यानंतर त्याची कारकीर्द झपाट्याने पुढे गेली.
वाईट काळ संपणार! ५ मे पासून ‘या’ राशींवर असणार देवी लक्ष्मीचा वरदहस्त; ‘त्रि-एकादश योग’ घडल्याने मिळू शकतो पैसा, प्रेम आणि प्रसिद्धी