-
तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दीन अहमद यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या शिफारशीनुसार २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर केली होती. या घटनेला नुकतीच ४८ वर्षे झाली आहेत. आणीबाणीला साधारण पाच दशके उलटली असली तरी तेव्हाच्या घटनांचा उल्लेख आजही केला जातो.
-
त्या काळात माध्यमांवर लादण्यात आलेली सेन्सॉरशिप, सक्तीने राबवलेली नसबंदी मोहीम आणि नेत्यांवर केलेली अटकेची कारवाई यामुळे लोकशाही मूल्यांना हरताळ फासला गेला, असा आरोप आजही केला जातो. आणीबाणीदरम्यानच्या याच घटनांवर बेतलेले बरेच चित्रपट बॉलिवूडमध्ये बनले. काही चित्रपटात थेटआणीबाणीबद्दल तर काही चित्रपटात अप्रत्यक्षपणे आणीबाणीवर टीका करण्यात आली.
-
शबाना आजमी, उत्पल दत्त, राज बब्बर यांचा १९७८ साली आलेल्या ‘किस्सा कुर्सि का’ हा चित्रपटही आणीबाणीवरच एका वेगळ्या पद्धतीने भाष्य करणारा होता.
-
१९७८ सालचा ‘नसबंदी’ हा विनोदी चित्रपटही आणीबाणीच्या कालखंडावर अन् त्यातील नसबंदीच्या विषयावर बेतलेला आहे. चित्रपट विनोदी असला तरी त्याचा विषय गंभीर होता.
-
२००३ सालचा ‘हज़ारों ख़्वाहिशें ऐसी’ हा सुधीर मिश्रा दिग्दर्शित चित्रपट त्यावेळी चांगलाच गाजला. यात केके मेनन, चित्रांगदा सिंह, शायनी अहुजा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. आणीबाणीच्या काळातील हे कथानक तीन तरुणांच्या जीवनावर भाष्य करतं.
-
‘बादशाहो’ या अजय देवगणच्या चित्रपटातही आणीबाणीदरम्यानच्या काही भयावह घटनांचा संदर्भ पाहायला मिळतो.
-
मधुर भांडारकर ‘इंदू सरकार’ हा चित्रपट तर इंदिरा गांधी आणि गांधी परिवार अन् आणीबाणीच्या अवती भोवतीच फिरणारा आहे.
-
आता अभिनेत्री कंगना रणौत इंदिरा गांधी यांच्या जीवनावर बेतलेला एक चित्रपट घेऊन येत आहे ज्याचं नावच ‘इमर्जन्सि’ आहे.
-
नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, यातील कंगनाच्या लूकची प्रचंद चर्चा होत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शनही कंगनानेच केलं आहे. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस / आयएमडीबी)
५ मार्च राशिभविष्य: कृतिका नक्षत्रात १२ राशींच्या काम, खर्च व प्रेमाची स्थिती कशी असणार? पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?