-
मराठी सिनेसृष्टीतील सदाबहार कलाकाराची जोडी म्हणून अशोक सराफ आणि निवेदिता जोशी सराफ यांच्याकडे पाहिले जाते.
-
आज त्या दोघांच्या लग्नाचा वाढदिवस आहे.
-
अशोक सराफ आणि निवेदिता सराफ ही जोडी कायमच चर्चेत असते.
-
त्यांच्या जोडीला ऑनस्क्रीनसह ऑफस्क्रिनवरही प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले.
-
या दोघांची लव्हस्टोरी आणि लग्नाचा किस्सा त्याकाळात फार गाजला होता.
-
अशोक सराफ आणि निवेदिता यांच्या वयामध्ये तब्बल १८ वर्षांचे अंतर आहे. मात्र त्यांच्या प्रेमात वयाचा अडसर कधीच आला नाही.
-
अशोक आणि निवेदिता यांची पहिली भेट एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान झाली होती.
-
निवेदिता यांच्या वडिलांनी आपल्या मुलीची ओळख अशोक सराफ यांच्यासोबत करुन दिली होती.
-
अशोक सराफ हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप कमी बोलताना दिसतात.
-
अशोक सराफ यांनी ते निवेदिताच्या प्रेमात कसे पडले? याचा खुलासा एका मुलाखतीदरम्यान केला होता.
-
“मी १९८८ मध्ये मामला पोरींचा हा चित्रपट करत होतो. त्या चित्रपटात माझ्यासोबत निवेदिताही होती.”
-
“’मामला पोरींचा’ या चित्रपटात एकत्र काम करताना निवेदिताचं पॅकअप झाले.”
-
“ती माझ्याजवळ आली आणि तिने फार सहज पुन्हा भेटू, बाय असे म्हटले.”
-
“खरंतर त्यावेळी मला फार वाईट वाटले होते. पण मी ते चेहऱ्यावर कुठेही दिसू दिले नाही.”
-
“त्यावेळी ती दरवाजातून बाहेर पडत असताना माझ्या सहज मनात आलं की ही समोर असलेल्या दाराजवळ गेल्यानंतर आपल्याकडे नक्की वळून बघणार आणि तसंच झालं.”
-
“त्यानंतर मला खात्री पटली की आमच्यात नक्कीच काहीतरी आहे”, असे अशोक सराफ म्हणाले.
-
दरम्यान अशोक सराफ आणि निवेदिता यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले.
-
पण ‘नवरी मिळे नवऱ्याला’ हा चित्रपट त्यांच्यासाठी खास ठरला.
-
या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान त्या दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
-
पण निवेदिता यांच्या कुटुंबियांना हे लग्न मान्य नव्हते.
-
‘आपल्या मुलीने चित्रपट क्षेत्रातील व्यक्तीशी लग्न करू नये’, अशी तिच्या आईची इच्छा होती. त्यामुळे त्यांच्या लग्नाला विरोध झाला.
-
त्या दोघांनी गोव्यातील मंगेशी मंदिरात जाऊन साधेपणाने लग्न केले.
-
लग्नानंतर निवेदिता सराफ यांनी अभिनयातून ब्रेक घेतला.
-
त्यांनी त्यांचा एकुलता एक मुलगा अनिकेत सराफ याच्या पालनपोषणाची जबाबदारी घेतली.
-
तर अशोक सराफ यांनी अभिनय कारकिर्दीवर लक्ष केंद्रीत करत अनेक चित्रपटात उत्कृष्ट भूमिका साकारल्या.
![prateik babbar did not invite family for wedding](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/prateik-babbar-did-not-invite-family-for-wedding.jpg?w=300&h=200&crop=1)
प्रतीक बब्बरने लग्नात वडिलांनाही बोलावलं नाही; सावत्र भावाने व्यक्त केली नाराजी, म्हणाला, “आमचं आयुष्य…”