-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील सर्वच कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील प्रसिद्ध कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजे दत्तू मोरे.
-
दत्तूने आजवर या कार्यक्रमात विविध भूमिका साकारत प्रेक्षकांना खळखळून हसवलं.
-
काही महिन्यांपूर्वी दत्तू मोरे हा विवाहबंधनात अडकला.
-
दत्तूने मंगळवारी २३ मे २०२३ रोजी कोर्ट मॅरेज करत लग्नगाठ बांधली.
-
दत्तूने त्याच्या लग्नाबाबत कुठेही भाष्य केलं नव्हतं.
-
त्यामुळे त्याच्या लग्नाची बातमी आल्यानंतर चाहत्यांना सुखद धक्का बसला.
-
दत्तूने गुपचूप लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली.
-
आता नुकतंच दत्तूने त्याच्या प्री-वेडिंगचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
यातील काही फोटोत दत्तू आणि त्याची पत्नी स्वातीने काळ्या रंगाचा वेस्टर्न आऊटफिट परिधान केला आहे.
-
तर काही फोटोत ते दोघेही पांढऱ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसत आहेत.
-
यावेळी दत्तूने रोमँटिक पोझही दिल्याचे पाहायला मिळत आहे.
-
त्यांच्या या फोटोवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.
-
‘मेड फॉर इच अदर’, ‘खूप छान’, ‘तुम्हा दोघांना शुभेच्छा’, अशा अनेक कमेंट दत्तू मोरेच्या पोस्टवर पाहायला मिळत आहे.
-
तर काहींनी हार्ट इमोजी शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.
-
दरम्यान दत्तूच्या पत्नीचं नाव स्वाती घुनागे असं आहे.
-
स्वाती ही व्यवसायाने डॉक्टर आहे. ती स्त्रीरोग तज्ञ असून तिचं पुण्यात स्वत:चं क्लनिक आहे.
-
स्वाती अनेक सामाजिक कार्यात सक्रीय असते.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”