-
मराठमोळा अभिनेता पृथ्वीक प्रताप ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत पोहोचला.
-
अभिनय आणि विनोदाची उत्तम सांगड घालत पृथ्वीक प्रेक्षकांना खळखळवून हसवतो.
-
मराठी कलाविश्वात येण्यापूर्वी पृथ्वीकने आयुष्यात खूप संघर्ष केला आहे.
-
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्या महाविद्यालयीन जीवनाबद्दल खुलासा केला आहे.
-
पृथ्वीक प्रतापने त्याचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या दादरमधील सुप्रसिद्ध कीर्ती कॉलेजमध्ये पूर्ण केले आहे.
-
महाविद्यालयीन जीवनातील संघर्षाबद्दल सांगताना पृथ्वीक म्हणाला, “माझ्या कॉलेजमध्ये असताना मी नाटकात काम करायचो त्यामुळे आयुष्यात खूप काही शिकलो.”
-
“कॉलेजला जायला सकाळी बाहेर पडायचो त्यामुळे घरून आणलेला डबा संपला की, नंतर काय खायचं असा प्रश्न निर्माण व्हायचा. तेव्हा मी कीर्ती कॉलेजकडे चहावाल्याजवळ पार्लेजी बिस्किटं खायचो.” असे पृथ्वीकने सांगितले.
-
पृथ्वीकबरोबर तेव्हापासून प्रशांत केणी, रोहित माने, चेतन गुरव, वनिता खरात, स्नेहन शिदम, सागर जाधव, रोनक शिंदे हे मित्र होते.
-
आम्ही सगळ्या मित्रांनी एकत्र संघर्ष केल्याचे पृथ्वीकने सांगितले.
-
“तेव्हाचे दिवस फार त्रासदायक होते. कोणाचेच पोट भरायचे नाही, तरीही आम्ही प्रत्येकजण एकमेकांना मदत करायचो. आम्ही तेव्हा एकत्र होतो आताही एकत्र आहोत” असे अभिनेता म्हणाला.
-
“कीर्ती कॉलेजच्या कट्ट्यावर आमच्या असंख्य आठवणी आहेत.”
-
दरम्यान, अलीकडे परिस्थिती तुलनेने खूप सुधारलीये म्हणून आता जेव्हा कधी भेटतो तेव्हा एकत्र हॉटेलमध्ये जात असल्याचे पृथ्वीकने सांगितले.
Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला निधी…”