-
अभिनेत्री काजोल देवगण सध्या लस्ट स्टोरीज २ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
-
या चित्रपटात तिच्याबरोबर अभिनेते कुमुद मिश्रादेखील आहेत.
-
‘लस्ट स्टोरीज २’ मध्ये अभिनेत्री काजोलबरोबर अभिनेता कुमुद मिश्रांचे बोल्ड सीन आहेत.
-
चित्रपटातील आपल्या बोल्ड भूमिकेबद्दल आणि चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभवाबद्दल कुमुद मिश्रांनी भाष्य केलं.
-
तसेच काजोलबरोबरचे बोल्ड सीन पाहून कुटुंबियांची प्रतिक्रिया काय होती, याबद्दल त्यांनी माहिती दिली.
-
“माझी सहकलाकार काजोल होती. ती अगदी सहजपणे जबरदस्त काम करते. आम्हा कलाकारांना तो टप्पा गाठायला अनेक वर्षे लागतात. इतकी वर्षे काम केल्यानंतर सहकलाकारांशी कसं वागायचं, हे त्यांना माहीत असतं. या फिल्ममध्ये सर्वात मोठा प्लस पॉइंट काजोल होती,” असं कुमुद मिश्रा म्हणाले.
-
“काजोल एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. तिने माझ्यासाठी काम सोपं केलं होतं. काजोलशी झालेल्या पहिल्या भेटीतच तिच्याबरोबर काम करणं सोपं होईल, असं मला वाटलं होतं,” असंही कुमुद मिश्रा म्हणाले.
-
या चित्रपटातील बोल्ड सीनबद्दल कुटुंबियाची प्रतिक्रिया काय होती? असं विचारल्यावर ते म्हणाले, ‘माझ्या कुटुंबातील कुणीही हा चित्रपट अद्याप पाहिला नाही’.
-
“माझा मुलगा फक्त १४ वर्षांचा आहे, साहजिकच त्याने चित्रपट पाहावा असे मला वाटत नाही,” असं त्यांनी नमूद केलं.
-
मी घरच्यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहे. अनेकवेळा माझे कुटुंबीय त्या विषयावर बोलत नाही, तेव्हा तो चित्रपट त्यांना आवडला नसावा, असं मी समजतो.
-
माझ्या कामाबद्दल त्यांनी चांगली प्रतिक्रिया द्यावी, अशी अपेक्षा मला असते.
-
जेव्हा माझे कुटुंबीय समीक्षकांप्रमाणे माझ्या कामाबद्दल प्रतिक्रिया देतात, तेव्हा मला जास्त आवडतं. काहीतरी नवीन करायला वाव आहे अशी आशा निर्माण होते आणि मीही त्या दिशेने काम करतो.
-
माझी पत्नी देखील एक अभिनेत्री आहे, ती अनेक वेळा बोलते आणि अनेक वेळा गप्प राहते.
-
जेव्हा ती बोलत नाही, तेव्हा मला तिच्या डोळ्यात वाचावं लागतं, मग आम्ही त्याबद्दल चर्चा करतो, असंही कुमुद मिश्रा म्हणाले.
-
(सर्व फोटो कुमुद मिश्रा व काजोल यांच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख