-
‘रंग माझा वेगळा’ फेम मराठी टीव्ही बालकलाकार साईशा भोईरची आई पूजा भोईर पोलीस कोठडीत आहे.
-
पूजा भोईर हिला मे २०२३ मध्ये आर्थिक फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आली होती.
-
त्यानंतर नुकत्याच झालेल्या सुनावणीत तिची कोठडी ७ जुलैपर्यंत वाढवण्यात आली होती.
-
पूजाने १६ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार एका शैक्षणिक संस्थेच्या संचालकाने आणि त्याच्या पत्नीने केली होती.
-
त्यानंतर कफ परेड पोलिसांनी पूजाला अटक केली होती.
-
तेव्हापासून ती कोठडीत होती आणि आता तिच्या कोठडीत ७ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
-
आता या प्रकरणात एक नवीन अपडेट आली आहे.
-
पोलीस साईशाचे आई-वडील पूजा भोईर आणि विशांत भोईर यांची मालमत्ता जप्त करण्याच्या तयारीत आहेत.
-
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, सर्वात आधी तक्रार करणाऱ्या जोडप्याशिवाय अनेकांनी पूजाविरोधात तक्रारी नोंदवल्या आहेत.
-
. गुंतवणुकदारांनी काही महिन्यांपूर्वी पूजाच्या कंपनीत पैसे गुंतवले होते, तिने त्यांना आठवड्याला १० टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले होते.
-
त्या लोकांना अनेक आठवडे पैसे मिळाले होते परंतु, नंतर त्यांचे चेक बाऊन्स झाले.
-
त्याबाबत विचारणा केली असता पूजाने त्यांना नीट उत्तरं दिली नाहीत म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
-
दुसरीकडे, नाशिकमधील काही जणांनी पूजाचा पती आणि अभिनेत्री साईशा भोईरचे वडील विशांत भोईर यांच्याविरुद्ध लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
-
पूजाच्या आईने लोकांची ३ कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केली आहे.
-
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, चौकशीमध्ये साईशाच्या आईच्या डिमॅट खात्यात ३ कोटी ३३ लाख रुपये सापडले आहेत.
-
याशिवाय तिच्याकडे २७ लाखांचे सोन्याचे दागिने आणि मुंबईत एक आलिशान फ्लॅट आहे.
-
तसेच कार, बँक खाती आणि साईशाच्या खात्यांशी संबंधित बचतीचे पैसे यासह इतर मालमत्तांचा शोध सुरू असून त्या लवकरच जप्त केल्या जातील.
-
विशांत व पूजाने साईशाबरोबर केलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय ट्रिपचीही पोलीस चौकशी करणार आहेत.
-
पूजाने लोकांची ३ कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचं कळतंय.
-
लवकरच आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणी तपास हाती घेणार आहे.
-
-
नाशिकमधील काही जणांनी पूजाचा पती विशांत भोईरविरोधात लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रारी दिल्या आहेत.
-
सध्या विशांत फरार आहे.
-
लवकरच साईशाची तिच्या मालिकेच्या सेटवर चौकशी केली जाईल.
-
दरम्यान, शोच्या निर्मात्यांनी ‘इ-टाइम्स’ला दिलेल्या वृत्तानुसार, साईशा लहान असल्यामुळे त्यांच्या शोमध्ये काम करत राहील.
-
कारण तिच्या कुटुंबात काय घडत आहे हे समजण्यासाठी ती खूप लहान आहे.
-
‘चला हवा येऊ द्या’ची संपूर्ण टीम सध्या सेटवर तिच्या आई-वडिलांबद्दल बोलणं टाळत आहे.
-
साईशाला या गोष्टींचा त्रास होऊ नये याची काळजी घेतली जात आहे.
-
(सर्व फोटो – पूजा भोईरच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

Sanjay Raut : मनसेच्या समर्थनात ठाकरेंची शिवसेना मैदानात, पक्षाची मान्यता रद्द करण्याच्या याचिकेबाबत म्हणाले…