-
अभिनेत्री प्रिया बापट सध्या तिच्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या तिसऱ्या सीझनमुळे चांगलीच चर्चेत आहे.
-
प्रिया सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
-
अलीकडेच प्रियाने तिच्या लंडन ट्रिपचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते.
-
आता प्रियाने गडद पिवळ्या रंगाच्या काठपदराच्या साडीतील सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
पिवळ्या रंगाच्या साडीवर प्रियाने कॉन्ट्रास्ट जांभळ्या रंगाचा ब्लाऊज परिधान केला होता. मराठमोळ्या लुकमध्ये प्रिया फारच सुंदर दिसत आहे.
-
अभिनेत्रीच्या पोस्टवर तिच्या चाहतीने केलेल्या एका खास कमेंटने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
साडीतील सुंदर लुकमध्ये प्रियाच्या गळ्यातील “मंगळसूत्र मिसिंग” आहे अशी कमेंट एका युजरने केली आहे.
-
प्रियाने साडीमधील या फोटोंना “मराठमोळा साज…” असे कॅप्शन दिले आहे.
-
अभिनेत्रीच्या लुकचे तिच्या अनेक चाहत्यांनी कौतुक केले आहे. ( फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम )

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”