-
‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेल्या प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी काही दिवसांपूर्वीच एकमेकांना डेट करत असल्याचा खुलासा केला आणि त्यांचं नातं सर्वांसमोर आणलं.
-
मुग्धा आणि प्रथमेशने त्यांच्या प्रेमाचा खुलासा केल्यावर अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
-
त्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी त्याचबरोबर मनोरंजन सृष्टीतील दिग्गज कलाकारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
-
गेली साडेतीन ते चार वर्ष ते दोघं एकमेकांना डेट करत आहेत.
-
मुग्धा आणि प्रथमेशने त्यांचं नातं सर्वांसमोर आणल्यावर त्यांच्या चाहत्यांमध्ये त्यांच्याबद्दल खूप उत्सुकता निर्माण झाली होती.
-
त्यामुळे प्रथमेश व मुग्धाने त्यांच्या चाहत्यांसाठी एक खास प्रश्न उत्तरांचं सेशन आयोजित केलं होतं.
-
त्यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ पोस्ट करून त्यांच्या चाहत्यांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं दिली. त्यावेळी दोघांनी त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी सांगितली.
-
प्रथमेशने मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्य आणि इतिहास या विषयांमध्ये पदवी मिळवली आहे.
-
याचबरोबर त्यानंतर त्याने पुण्याच्या भारती विद्यापीठातून MA in Music पूर्ण केलं आहे.
-
तर दुसरीकडे, मुग्धाने रुपारेल कॉलेजमधून BSC with Statistics केलं आणि त्यानंतर तिने मुंबई विद्यापीठातून MA in Music ही पदवी मिळवली.
-
गेल्याच महिन्यात मुग्धाच्या या मास्टर्स डिग्रीचा निकाल लागला आणि त्यात तिला सुवर्णपदकही मिळालं
-
या दोघांचं शिक्षण काय हे कळल्यावर आता सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे.

LSG vs MI: “साधी गोष्ट आहे, संघाला…”, तिलक वर्माच्या रिटायर्ड आऊटवर हार्दिक पंड्याचं मोठं वक्तव्य, मुंबईच्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?