-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो.
-
गेल्या अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे.
-
या कार्यक्रमात दिसणारे कलाकार कायमच चर्चेत असतात.
-
आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर हे कलाकार प्रेक्षकांना पोट दुखेपर्यंत हसायला लावतात.
-
या मालिकेतील कलाकार नेहमीच प्रसिद्धीझोतात असतात.
-
आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील कलाकार एका भागासाठी किती मानधन घेतात? याची चर्चा रंगली आहे.
-
नुकतंच एका मीडिया रिपोर्टसने त्यांच्या मानधनाबद्दलची माहिती दिली आहे.
-
अभिनेत्री शिवाली परब उत्तम अभिनय व विनोदाचं अचूक टायमिंग साधत शिवाली प्रेक्षकांना खळखळवून हसवते.
-
‘कल्याणची चुलबुली’ अशी तिची ओळख आहे.
-
शिवाली परब एका भागासाठी ३५ ते ३७ हजार रुपये मानधन घेते.
-
रसिका वेंगुर्लेकर ही या कार्यक्रमात मालवणी भाषेतून अनेकदा विनोद करत असते.
-
रसिका या कार्यक्रमाच्या एका भागासाठी २५ ते ३० हजार मानधन घेते.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरातने नाटकांपासून तिच्या अभिनयक्षेत्रातील करिअरला सुरुवात केली.
-
मेहनतीच्या जोरावर तिने बॉलिवूडपर्यंत मजल मारली.
-
वनिता खरात एका भागासाठी ३२ ते ३५ हजार रुपये मानधन घेते.
-
तर अभिनेत्री नम्रता संभेरावलाही एका भागाचं ३० ते ३७ हजार मानधन मिळतं.
-
समीर चौघुले हे महाराष्ट्राची हास्यजत्रामुळेच प्रसिद्धीझोतात आले. त्यांच्या विनोदबुद्धीचं नेहमीच कौतुक होताना दिसतं.
-
समीर चौघुले एका भागासाठी ४० ते ५० हजार मानधन घेतात.

Maharashtra Budget 2025 LIVE Updates: आज लाडक्या बहिणींसाठी २१०० रुपयांची घोषणा होणार? अजित पवारांच्या अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात