-
केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाला सध्या प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
-
‘बाईपण भारी देवा’ चित्रपट ३० जूनला सर्वत्र प्रदर्शित झाला.
-
चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा चौधरी या अभिनेत्रींनी मुख्य भूमिका साकारली आहे.
-
चित्रपटातील मुख्य अभिनेत्रींपैकी वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, सुकन्या मोने आणि शिल्पा नवलकर यांनी अलीकडेच एका मुलाखतीला हजेरी लावली होती.
-
यावेळी या चौघींनी त्यांना मिळालेल्या आयुष्यातील पहिल्या कमाईची आठवण प्रेक्षकांना सांगितली.
-
सर्वप्रथम वंदना गुप्ते म्हणाल्या, “मला नाटकासाठी पहिल्यांदा २५ रुपये मानधन मिळाले होते. त्या पैशातून मी काय घेतले हे मला नेमके आठवत नाही.”
-
अभिनेत्री शिल्पा नवलकर म्हणाल्या, “दूरदर्शवर केलेल्या एका डान्ससाठी मला सर्वप्रथम १०० रुपये मानधन मिळाले होते. आम्ही तेव्हा कोळी डान्स केला होता. त्यानंतर मी त्या कमाईतून २ रुपयांचे पुस्तक विकत घेतले होते.”
-
“मी खूप लहानपणी काम करायला सुरुवात केली होती त्यामुळे निश्चित सांगता येणार नाही मात्र, माझ्या कमाईतून मी माझ्या आईसाठी पावभाजी आणली होती”, असे सुचित्रा बांदेकर यांनी सांगितले.
-
सुकन्या मोने म्हणाल्या, “मी माझ्या पहिल्या कमाईतून कोलकात्यावरून माझ्या आईसाठी ६८ रुपयांची साडी आणली होती. त्याअगोदर मला कोणत्याच कामासाठी पैसे मिळाले नव्हते.”
-
अशा पहिल्या कमाईच्या विविध आठवणी अभिनेत्रींनी आपल्या चाहत्यांना सांगितल्या.
-
‘बाईपण भारी देवा’ला प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे दिग्दर्शक केदार शिंदेंसह चित्रपटाच्या संपूर्ण टीमने अलीकडेच सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले होते.
-
‘बाईपण भारी देवा’सुपरहिट ठरल्यामुळे मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार आनंद व्यक्त करत आहेत. ( फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम )

Ashish Shelar : “राज ठाकरेंशी वैयक्तिक संबंध होते ते आता संपले…”, आशिष शेलार यांचं वक्तव्य