-
प्रथमेश लघाटे हा आजच्या तरुण पिढीतील आघाडीच्या गायकांपैकी एक आहे.
-
‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’पासून प्रेक्षक त्याला बघत आले आहेत.
-
त्याच्या गायनाचं नेहमीच भरभरून कौतुक होत असतं.
-
प्रथमेश खूप खवय्या आहे. पण तितकीच तो त्याच्या आहाराची काळजी घेतो.
-
काही वर्षांपूर्वी तो ‘सा रे ग म प’मध्ये असताना त्याला सगळे ‘मोदक’ असं म्हणत होते.
-
पण गेल्या काही महिन्यांमध्ये त्याने १४ किलो वजन कमी केलं आहे. ते कसं केलं हे आता त्याने सांगितलं आहे.
-
तो म्हणाला, “मी डाएट १००% पाळतो आणि माझं डाएट आयुर्वेदिक पद्धतीचं आहे.”
-
“आयुर्वेदामध्ये दिनचर्या आणि ऋतुचर्या अशा दोन व्याख्या आहेत. त्यानुसार मी माझ्या आहारात बदल करतो.”
-
“मी दोनदा पोटभर जेवतो, पण आधेमद्धे काही खात नाही. मी मैदा खाणं बंद केलं आहे आणि रात्री उशिरा जेवणंही मी बंद केलं आहे.”
-
“कधी कधी आमच्या गाण्याच्या कार्यक्रमांमुळे आम्हाला रात्री उशीर होतो आणि गायल्यामुळे चांगलीच भूक लागते.”
-
“अशावेळी मी उपमा किंवा खिचडी असं हलकं काहीतरी खातो.”
-
पुढे व्यायामाबद्दल बोलताना तो म्हणाला, “मी कधीच कुठेही जिम वगैरे लावलेली नाही. मी पारंपारिक पद्धतीने व्यायाम करतो आणि तो मी रोज करतो.”
-
“सूर्यनमस्कार, दोरी उड्या, चालणं आणि प्राणायाम हा व्यायाम मी करतो.”
-
“माझा एक भाऊ एमडी आयुर्वेद आहे त्याने मला हे सगळं प्लॅन करून दिलं आहे. तर माझ्यासारखंच डाएट मुग्धाही फॉलो करते.”
-
त्यामुळे प्रथमेशची ही फिटनेस जर्नी अनेकांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल