-
देखण्या रुपाची आणि गोड गळ्याची गायित्री म्हणजे आर्या आंबेकर.
-
आर्या आंबेकरला तिच्या गायनामुळे मोठी प्रसिद्धी मिळाली. पण तिच्या गोड चेहऱ्यामुळेही ती सर्वांची लाडकी झाली आहे.
-
आर्या आंबेकर ही झी मराठीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या रिअॅलिटी शो मुळे प्रसिद्धीझोतात आली. आर्या आंबेकर ही आज अनेकांच्या गळ्यातील ताईत झाली आहे.
-
संगीत संयुक्त मानापमान या संगीत नाटकासाठी आर्या आंबेकरने सादरीकरण केले.
-
आर्याने २०१७ साली आलेल्या ती सध्या काय करते या चित्रपटातही काम केलं होतं. त्यामुळे तिचा अभिनयही प्रेक्षकांना फार आवडतो.
-
संगीत संयुक्त मानापमानमध्ये तिच्यासोबत प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे सुद्धा होते.
-
या नाटकासाठी तिने केलेली पारंपरिक वेशभुषा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
-
तिच्या या प्रयोगाला हजर राहिलेल्या अनेक प्रेक्षकांनीही तिच्या या पोस्टवर कमेंट केली आहे.
-
“खरंच सुरांवर तुझी कमांड आहे आर्या. उत्तम संगीतरचना, उत्कृष्ट गायन आणि एखाद्या प्रोफेशनल नाट्यकलाकाराप्रमाणे चेहऱ्यावरील हावभाव म्हणजे अप्रतिम, अशी प्रतिक्रिया या प्रेक्षकाने तिच्या या फोटोंखाली दिली आहे.
-
आर्याने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तिच्या पोस्टवर कमेंटचा पाऊस पडू लागला आहे.
-
आर्याच्या प्रत्येक फोटोलाच लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत असतो. तिचे नवनवे फोटो पाहण्यासाठी तिचे चाहते आतूर असतात.

Sambhajiraje : “वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडावरुन हटवा, ३१ मे पर्यंत…”; संभाजीराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र