-
बाईपण भारी देवा चित्रपटाने प्रदर्शनाच्या दहा दिवसांमध्ये रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे.दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या पोस्टनुसार चित्रपटाने दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी १३. ५० कोटींची कमाई केली आहे.
-
चित्रपटात साधना हे पात्र साकारलेल्या सुकन्या मोने कुलकर्णी यांच्या अभिनयाचे महिला वर्गाकडून विशेष कौतुक होत आहे. हीच कौतुकाची थाप देत संजय मोने यांनी सुद्धा खास पोस्ट लिहिली आहे.
-
संजय मोने यांनी पोस्टमध्ये सुकन्या कुलकर्णी यांच्यासह लेक जुलियाचे सुद्धा कौतुक केले आहे. आता जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही ज्युलिया कोण आणि तिचं कौतुक कशासाठी तर, चला आपण थेट उत्तरच पाहूया…
-
सुकन्या कुलकर्णी यांचं तरुणपणीचं पात्र चित्रपटात एका खास व्यक्तीने साकारलेले आहे. ही कलाकार अन्य कोणी नसून सुकन्या व संजय मोने यांची लाडकी लेक जुलिया आहे.
-
जुलिया ही ऑस्ट्रेलियात शिक्षण घेते. मध्यंतरी सुकन्या मोने यांनी जुलियाच्या वाढदिवसाला तिची एक पोस्ट शेअर केली होती. ती परदेशात शिकायला गेली असल्याचे त्यांनी लिहिले होते.
-
जुलियाचा सिनेमामध्ये डेब्यू करण्याचा कोणताही प्लॅन नव्हता पण योगायोगाने सगळं जुळून आलं. तिनेही खूप मज्जा केली असे सुकन्या यांनी एका ,मुलाखतीत सांगितले होते.
-
बाई पण भारी देवाच्या वेशभूषाकार युगेशा ओमकारने सांगितल्यानुसार, चित्रपटात सुकन्या मोने यांच्या नटराजाच्या अंगठीला हायलाईट करण्यात आले आहे. तरुणपणीच्या सीनमध्ये जुलियाला सुद्धा ही अंगठी घालायची होती.
-
या सीनच्या निमित्ताने सुकन्या मोने यांनी लाडक्या लेकीसाठी नटराजाची (स्वतःच्या हातात असल्यासारखीच) हुबेहूब अंगठी बनवून घेतली होती.
-
याशिवाय सिनेमात आदेश व सुचित्रा बांदेकर यांचा लेक सोहमने सुद्धा आईबरोबर स्क्रीन शेअर केली आहे.
IND vs ENG : स्वत:ची विकेट पाहून अक्षरही अवाक्, गिलने तर डोक्यालाच लावला हात; आदिलच्या जादुई चेंडूचा VIDEO व्हायरल