-
‘पठाण’च्या तूफान यशानंतर बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आता ‘जवान’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
नुकतंच बहुचर्चित जवान चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाच्या प्रिव्ह्यू ट्रेलरमध्ये बरेच अॅक्शन सीन्स पाहायला मिळत आहेत.
-
‘जवान’मध्ये शाहरुखबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकेत आहेत.
-
इतकेच नाही अभिनेत्री दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, प्रियमणी, गिरिजा ओक, संजिता भट्टाचार्य, लहर खान, आलिया कुरेशी, रिद्धी डोंगरा, सुनील ग्रोव्हर आणि मुकेश छाबरा हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत.
-
‘जवान’च्या ट्रेलरमध्ये आपण दीपिकाला साडी नेसून अॅक्शन करताना पाहू शकतो. ट्रेलरच्या शेवटी “जब मैं विलन बनता हूँ ना…” या वाक्याने शाहरुखने त्याच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली असून त्यांच्या मनात अनेक प्रश्नही आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना ७ सप्टेंबरला मिळणार आहेत.
-
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक असलेल्या अॅटलीने ‘जवान’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती गौरी खानने केली असून सहनिर्माता गौरव वर्मा आहे.
-
‘जवान’ चित्रपटात मोठी कास्ट पाहायला मिळत आहे. पण या कास्टने ‘जवान’साठी किती मानधन घेतले आहे तुम्हाला माहीत आहे का? आज आपण जवान चित्रपतील कलाकारांच्या मानधनाबद्दल जाणून घेऊया.
-
शाहरुख खान : सुमारे ४० कोटी रुपये
-
विजय सेतुपती : सुमारे २१ कोटी रुपये
-
नयनतारा : सुमारे ११ कोटी रुपये
-
प्रियमणी : सुमारे २ कोटी रुपये
-
सानिया मल्होत्रा : सुमारे १ ते २ कोटी रुपये
-
सुनील ग्रोव्हर : सुमारे ७५ लाख रुपये
-
योगी बाबू : सुमारे ५० लाख रुपये
-
मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, अद्याप गिरिजाच्या मानधनाबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. तरीही, गिरिजा इतक्या मोठ्या चित्रपटात काम करणार ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.
-
दरम्यान, प्रदर्शनापूर्वीच ‘जवान’ चित्रपटाचे ओटीटी अधिकार २५० कोटींना विकले गेल्याची माहिती समोर आली आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये ७ सप्टेंबर रोजी जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
-
येथे देण्यात आलेली माहिती वेगवेगळ्या मीडिया रिपोर्टसवर आधारित आहे. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)

शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?