-
शाहरुख खानच्या बहुचर्चित ‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला.
-
‘जवान’च्या ट्रेलरला सोशल मीडियावर अवघ्या २४ तासांमध्ये ११२ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.
-
‘जवान’मध्ये बॉलीवूड आणि साऊथ सुपरस्टार्सची तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे.
-
‘जवान’ चित्रपटामध्ये शाहरुख खान मुख्य भूमिका साकारणार असून, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार यात किंग खानचा डबल रोल असणार आहे.
-
शाहरुखबरोबर चित्रपटात सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा मुख्य भूमिकेत दिसेल.
-
दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती ‘जवान’मध्ये नकारात्मक भूमिका साकारणार आहे.
-
बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण शाहरुखच्या ‘जवान’मध्ये कॅमिओ करणार आहे.
-
मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. ट्रेलरमध्ये गिरिजा शाहरुखच्या टीमबरोबर दमदार ॲक्शन करताना दिसत आहे.
-
बॉलीवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा, प्रियमणी, संजिता भट्टाचार्य, लहर खान, आलिया कुरेशी, रिद्धी डोंगरा, सुनील ग्रोव्हर आणि मुकेश छाबरा हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसतील.
-
‘जवान’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अॅटलीने सांभाळली आहे. चित्रपटातील प्रत्येकाच्या लूकचे विशेष कौतुक केले जात आहे.
-
शाहरुखचे टक्कल, दीपिकाचे साडी नेसून केलेले ॲक्शन सीन आणि नयनताराच्या डॅशिंग अंदाजाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
‘जवान’ हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये ७ सप्टेंबर रोजी जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

“रेल्वेने गेलेल्या, कधीही विमानात न बसलेल्या लोकांना विमानातून परत आणलं”, शिंदे गटाच्या खासदाराच्या विधानाची चर्चा