-
‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र क्रेझ सुरु आहे.
-
प्रत्येक घराघरात ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातील गाणी, डायलॉगही हिट झाले आहेत.
-
या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी-मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत.
-
‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात सुकन्या मोने या साधना काकडे हे पात्र साकारत आहे.
-
तर साधनाच्या मुलाचे लग्न झालेल असून तिच्या सूनेचे नाव माधवी असे आहे.
-
माधवी भोसले या पात्राची चर्चा रंगली असून तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक होत आहे.
-
हे पात्र साकारणारी अभिनेत्री नेमकी कोण आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
-
या चित्रपटात माधवी भोसले हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव रिया शर्मा असे आहे.
-
रिया ही मूळची नागपूरची असून तिचा जन्म ९ ऑक्टोबर १९९८ रोजी झाला.
-
ती २४ वर्षांची आहे.
-
रिया ही हिंदी मालिकांमधील आघाडीची अभिनेत्री आहे.
-
तिने आतापर्यंत अनेक हिंदी मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
-
रियाने २०१८ मध्ये ‘सात फेरो की हेरा फेरी’ या मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केले.
-
यात तिने चिंकी टंडन हे पात्र साकारले होते.
-
त्यानंतर ती ‘पिंजरा खुबसुरती का’ या मालिकेत डॉ. मयुरा दुबे शुक्ला म्हणून झळकली.
-
यानंतर तिने ‘काशीबाई बाजीराव बल्लाळ’ या मालिकेत काशीबाई हे पात्र साकारलं होतं.
-
तर ‘ध्रुव तारा – समय सदी से परे’ या मालिकेत ती राजकुमारी ताराप्रिया सिंग या भूमिकेत दिसली.
-
‘बाईपण भारी देवा’ हा रियाचा पहिलाच चित्रपट आहे.
-
विशेष म्हणजे यापूर्वी तिने कधीच मराठी मालिका किंवा चित्रपटात काम केलेलं नाही.
-
रिया लवकरच ‘कोनमॅन’ या चित्रपटात झळकणार आहे.
-
सध्या या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
९ फेब्रुवारी राशिभविष्य: त्रिपुष्कर योगात मेष, मीन राशींच्या सुखाचा होणार शुभारंभ; कोणाची इच्छापूर्ती तर कोणाच्या आयुष्यात होतील अनपेक्षित बदल