-
दाक्षिणात्य मनोरंजन सृष्टीने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. या चित्रपटांनी बॉलिवूड चित्रपटांनाही मागे सोडलं आहे.
-
ऑस्करमध्ये ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला पुरस्कार मिळाल्यानंतर संपूर्ण जगाची दाक्षिणात्य चित्रपटांकडे पाहण्याची नजरच बदलली आहे.
-
‘पुष्पा’, ‘केजीएफ’, ‘सीता रामम’, ‘बाहुबली’, ‘कंतारा’ असे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरले. यामुळेच देशभरात आता दाक्षिणात्य चित्रपटांची क्रेझ वाढत चालली आहे.
-
अशातच महाराष्ट्र आणि मराठी प्रेक्षकांसाठी एक अत्यंत अभिमानास्पद बातमी समोर आली आहे.
-
लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर ही तेलुगू मनोरंजन विश्वातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे.
-
हिंदी मालिका ‘कुमकुम भाग्य’मधून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या मृणाल ठाकूरने अभिनयाच्या जोरावर चित्रपट निर्मात्यांना तिच्याकडे लक्ष देण्यास भाग पाडले.
-
‘लव्ह सोनिया’ या चित्रपटातून तिने तिच्या अभिनयाची छाप उमटवली. यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्ताच्या भुमिका बजावल्या.
-
मात्र, ‘सीता रामम’ या चित्रपटामुळे देशभरातील प्रेक्षकांनी तिची दखल घेतली. इतकेच नाही तर माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही तिच्या अभिनयाचे जाहीर कौतुक केले.
-
‘सीता रामम’ ला मिळालेल्या यशानंतर मृणालने आपले मानधन वाढवले आहे. या चित्रपटानंतर ती जवळपास तीन दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करणार आहे.
-
दाक्षिणात्य सिनेसृष्टीत समंथा प्रभू, रश्मिका मंदाना, पूजा हेगडे, तमन्ना भाटिया, काजळ अग्रवाल अशा अनेक आघाडीच्या अभिनेत्री आहेत.
-
मात्र यांना मागे टाकून मृणाल ठाकूर तेलुगू सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे. काही मीडिया रिपोर्टसनुसार मृणाल एका चित्रपटासाठी ४ ते ५ कोटी रुपये आकारत आहे.
-
मृणाल लवकरच ‘हाय नन्ना’ आणि ‘VD13’ या दाक्षिणात्य चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख