-
ज्येष्ठ मराठी सिने अभिनेते रवींद्र महाजनी यांच पुण्यातील तळेगाव येथे दुर्दैवी निधन झालं आहे.
-
रवींद्र महाजनी हे तळेगाव येथील सोसायटीच्या फ्लॅटमध्ये एकटेच राहत होते. महाजनींच्या निधनानंतर शेजारचे देखील हळहळले आहेत. कोणीजवळ नसताना त्यांचा मृत्यू झाला याचं खूप वाईट वाटत असल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं.
-
पोलिसांच्या माहितीनुसार, ज्येष्ठ सिने अभिनेते रवींद्र महाजनी यांचा शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
-
शेजाऱ्यांनी सांगितल्यानुसार महाजनींचा मृत्यू झाल्याचं कसं समजलं हे उघड झालं आहे.
-
महाजनींच्या शेजारी राहणाऱ्या पुजारी दाम्पत्याने सांगितले की, सुरवातीला याबाबत काहीच कल्पना नव्हती. कालपर्यंत सगळं ठीक होतं. आज सकाळी माळ्यावर दुर्गंधी पसरू लागली तेव्हा संशय आला.
-
दुर्गंध नेमका कुठून येतोय हे पाहण्यासाठी गेले असता फ्लॅट क्रमांक ३११ म्हणजेच महाजनींचे निवासस्थान इथून हा वास येत असल्याचं समजलं, याबाबत त्यांनी सुरक्षा रक्षकाला माहिती दिली व बोलावून घेतलं.
-
काही वेळाने या ठिकाणी पोलिसही पोहचले व घराचं दरवाजा तोडून आत गेल्यावर समोर रवींद्र महाजनी हे निपचित पडलेले दिसून आले.
-
महाजनींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु, त्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले.
-
रवींद्र महाजनी यांना काही आजार होते. यामुळे ते मोकळ्या हवेत राहण्यासाठी तळेगाव येथील घरात मागील आठ महिन्यांपासून राहायला आले असल्याचे सांगण्यात येत आहे
-
दुसरीकडे शेजाऱ्यांनी रवींद्र महाजनी हे मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते असल्याचे समजल्यानंतर त्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.
-
महाजनी हे फार कोणाशी बोलायचे नाही किंवा त्यांना कोणी भेटायलाही येत नसे, ते एकटेच रहात होते. व कधी जिन्यामध्ये किंवा बाल्कनीमध्ये दिसल्यावरच बोलणं व्हायचं असे शेजाऱ्यांनी सांगितले
-
रवींद्र महाजनी यांच्या निधनाची माहिती मिळताच त्यांचा मुलगा अभिनेता गश्मीर महाजनी सुद्धा तळेगावला पोहोचला होता. महाजनी यांच्यावर पुण्यातच अंत्यसंस्कार पार पडले.
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच