-
‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट सध्या तुफान गाजत आहे.
-
या चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं आहे.
-
या चित्रपटाचे सगळे शो हाउसफुल होताना दिसत आहेत.
-
हा चित्रपट म्हणजे सहा बहिणींची गोष्ट आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत.
-
याचबरोबर या चित्रपटामध्ये सुचित्रा बांदेकर व आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकरने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे.
-
या चित्रपटात तो सुचित्रा बांदेकर सकारात असलेल्या पल्लवी या व्यक्तिरेखेचा मुलगा दाखवला आहे.
-
या चित्रपटामध्ये तो त्याच्या आईला म्हणजेच सुचित्रा बांदेकर यांना व्हिडीओ कॉल करतो आणि त्याच्या एका परदेशी मैत्रिणीची ओळख त्यांना करून देतो असं दाखवलं गेलं आहे.
-
चित्रपटात सोहमबरोबर त्या परदेशी अभिनेत्रीला बघताच ती खरोखरच सोहमची गर्लफ्रेंड आहे असं अनेकांना वाटू लागलं.
-
तर आता त्यावर केदार शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
-
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले की, “सोहमबरोबर चित्रपटामध्ये दिसणारी ती मुलगी फक्त अभिनेत्री असून तिचा आणि सोहमचा काहीही संबंध नाही.”
-
केदार शिंदे यांनी सोहमचा आणि त्या अभिनेत्रीचा काहीही संबंध नसल्याचा खुलासा केल्यावर अनेकांचा गैरसमज दूर झाला.
-
तर याआधी सोहमलाही त्याबद्दल अनेक मेसेजेस येऊ लागले होते. अखेर दोन दिवसांपूर्वी त्याने देखील इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत त्याच्याबरोबर दिसणारी ती अभिनेत्री त्याची गर्लफ्रेंड नाही असं स्पष्ट केलं होतं.

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल