-
देवेंद्र फडणवीसांना पुरणपोळी आवडते असं वक्तव्य त्यांच्या पत्नी अमृता यांनी एकदा केलं होतं.
-
अमृता यांनी ते ३०-३५ पुरणपोळ्या पातेलंभर तूपासोबत सहज खायचे असं म्हटलं होतं.
-
त्यानंतर आपल्याला पुरणपोळ्या आवडत नाही, फार तर एखादी पुरणपोळी खाऊ शकतो, असं स्पष्टीकरण फडणवीसांनी दिलं होतं.
-
आता देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या आवडत्या पदार्थाबाबत सांगितलंय. ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात त्यांनी खुलासा केला आहे.
-
देवेंद्र फडणवीसांना गोड खायला खूप आवडतं, ते रात्री उठून बऱ्याचदा फ्रीजमधून गोड पदार्थ खातात, त्यामुळे फ्रीज लॉक करावा लागतो, असं अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या. त्याबाबत दिलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं.
-
फडणवीसांनी त्यांना डार्क चॉकलेट खूप आवडत असल्याचं म्हटलं आहे.
-
“हे खरं आहे, पण मी फ्रीजमधलं बाकी काहीच खात नाही, मला डार्क चॉकलेट्स खूप आवडतात.”
-
“मी रात्री १२ वाजता, १,२,३ वाजता केव्हाही आलो की फ्रीज उघडतो आणि डार्क चॉकलेट खातो.”
-
सर्व फोटो संग्रहित

IND vs NZ LIVE, Champions Trophy 2025 Final: रोहित शर्माची षटकाराने सुरूवात, भारताकडून गिल-रोहितची जोडी मैदानात