-
अक्षय कुमार त्याच्या ‘ओह माय गॉड 2’ (OMG 2) चित्रपटात देवाची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाल्यापासून चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अक्षय कुमारच्या आधी अनेक कलाकारांनी देवाची भूमिका साकारली आहे. आज आम्ही तुम्हाला अशा चित्रपटांबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये कलाकारांनी देवाची भूमिका साकारली आहे. पण यातील एकच चित्रपट हिट ठरला.
-
२०२२ मध्ये रिलीज झालेल्या ‘थँक गॉड’ या चित्रपटात अजय देवगण यमराजच्या भूमिकेत दिसला होता. ५० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर केवळ ३४.८९ कोटींची कमाई करू शकला. हा चित्रपट फ्लॉप झाला.
-
अमिताभ बच्चन २००८ मध्ये आलेल्या ‘गॉड तुस्सी ग्रेट हो’ या चित्रपटात देवाच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाचे बजेट २१ कोटी रुपये होते. त्याच वेळी, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ १२.५१ कोटींची कमाई केली. हा ही चित्रपट फ्लॉप ठरला.
-
१९७६ मध्ये रिलीज झालेल्या ‘बजरंगबली’ चित्रपटात दारा सिंह हनुमानाच्या भूमिकेत दिसले होते. मात्र चित्रपटाने अपेक्षित व्यवसाय केला नाही आणि तो फ्लॉप ठरला.
-
२००८ मध्ये रिलीज झालेल्या ‘हॅलो’ चित्रपटात कॅटरिना कैफने देवाची भूमिका साकारली होती. १४ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ १२.११ कोटींची कमाई केली. चित्रपट फ्लॉप झाला.
-
संजय दत्तने २००५ मध्ये आलेल्या ‘वाह लाइफ हो तो ऐसी’ या चित्रपटात यमराजची भूमिका केली होती. १२ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ ५.८४ कोटींची कमाई केली.
-
जितेंद्र यांनी १९९७ मध्ये आलेल्या लव कुश या चित्रपटात रामाची भूमिका साकारली होती. हा चित्रपटही खूप फ्लॉप झाला.
-
कादर खान १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तकदीरवाला’ या चित्रपटात यमराजच्या भूमिकेत दिसले होते. हा चित्रपटही खूप फ्लॉप झाला.
-
२०१२ मध्ये रिलीज झालेल्या ‘ओह माय गॉड’ (OMG) चित्रपटाबद्दल सांगायचे तर, अक्षय कुमार या चित्रपटात भगवान कृष्णाची भूमिका साकारताना दिसला होता. ६० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८१.४६ कोटींचे कलेक्शन केले.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख