-
‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करताना पाहायला मिळत आहे.
-
या चित्रपटातील सर्वच गाणी सोशल मीडियावर हिट झाली आहेत.
-
याच चित्रपटात शेवटी असणारे ‘मंगळागौर’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलंच गाजताना दिसत आहे.
-
या चित्रपटात शेवटच्या मंगळागौर या गाण्यात अभिनेत्रींनी वापरलेल्या साड्या चर्चेचा विषय ठरत आहेत.
-
या गाण्यात अभिनेत्रींचा लूकही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
-
या चित्रपटाची वेशभूषा साकारणारी युगेशा ओंकार हिने या साड्यांची खासियत सांगितली आहे.
-
“जेव्हा या चित्रपटाची स्क्रीप्ट माझ्या हातात आली, तेव्हा मला समजलं की मंगळगौरीसाठी दोन वेशभूषा करायच्या आहेत. यातील एक म्हणजे पहिल्या राऊंडसाठी आणि दुसरी म्हणजे शेवटच्या राऊंडसाठी.”
-
“पहिल्या राऊंडसाठी मी एकच पॅटर्न ठरवला होता आणि फक्त वेगवेगळे रंग त्यांना दिले होते.”
-
“त्यामुळे शेवटच्या राऊंडला काहीतरी वेगळं करावं, असं माझ्या डोक्यात होतं.”
-
“यासाठी आम्ही पांढरा किंवा ऑफ व्हाईट रंग निवडायचे ठरवले. कारण हा रंग स्वच्छता आणि शुद्धता दर्शवतो.”
-
“त्याबरोबरच या गाण्यातून त्या सर्वजणी एक नवीन सुरुवात करतात असेही दाखवायचे होते.”
-
“त्यानंतर मी प्रत्येकीचे पात्र, स्वभाव यानुसार साड्यांच्या पदरांना विविध रंग असावेत, असा विचार केला आणि त्यांचा पदर, दागिने आणि ब्लाऊज विविध रंगाचे असावे, असं ठरवलं.”
-
“मला या रंगामधून त्यांचे आधीचे नकारात्मक गुण आणि आताचे सकारात्मक गुण एकाचवेळी समजावे, असा दृष्टीकोन होता. त्यामुळेच मी त्या प्रत्येकीला विशिष्ट रंग दिला आहे.”
-
“जया म्हणजे रोहिणी हट्टंगडी यांच्यासाठी मी हिरवा रंग निवडला. कारण यां रंगाचे नकारात्मक गुण मत्सर, एकाच जागी अडकून राहणं आहे.”
-
“पण हिरव्या रंगाकडे सकारात्मकरित्या पाहिलं तर तो रंग मातृत्व, शांतता हे गुण दर्शवतो.”
-
“शशी म्हणजेच वंदना गुप्ते यांचा स्वभाव हा अपरिपक्वता, उथळपणा, नकारात्मक असा चित्रपटात दाखवण्यात आला आहे.”
-
“पण दुसरीकडे त्या तितक्याच उत्साही, साहसी आणि काळजी घेणाऱ्या देखील आहेत. त्यामुळेच मी त्यांना केशरी रंग देण्याचे ठरवले.”
-
तसेच साधना म्हणजेच सुकन्या मोने यांच्यासाठी मी जांभळ्या रंगाची निवड केली. कारण हा रंग हळवं, नकारात्मकता हे गुण दर्शवतो. त्याबरोबरच हा रंग धार्मिक, कल्पकता हे गुणही दर्शवतो.
-
“तर पल्लवी म्हणजेच सुचित्रा बांदेकर यांना मी गडद निळा दिला आहे. कारण हा रंग डिप्रेशन, एकटेपणा हे नकारात्मक गुण दर्शवतो. त्यासह निर्भयीपणे राहणं, प्रामाणिकपणा हे देखील गुण यात आहेत.”
-
“तसेच केतकीची भूमिका साकारणारी शिल्पा नवलकर हिचे पात्र या चित्रपटात स्वत:बद्दल खूप अभिमान असणं, मिरवणं, असं दाखवण्यात आलं आहे. त्याबरोबरच त्यांच्यात सहानुभूती, संवेदनशीलताही पाहायला मिळते. त्यामुळेच तिला मी फिकट निळा रंग दिला आहे.”
-
“तर चारु दीपा परबला मी लाल रंगाचा पदर असलेली साडी दिली आहे. याचं कारण म्हणजे लाल रंग दबाव, ताणतणाव दर्शवतो. त्याबरोबरीने हा रंग प्रेम, उर्जा, धाडस याचेही प्रतिक मानला जातो.”
-
“मी रंगांचा सर्व अभ्यास करुनच हे रंग निवडले होते. तसेच या गाण्यासाठी आम्ही ऑफ व्हाईट साड्या घेतल्या.”
-
“या साड्या मृगा सिल्कमध्ये आहेत. तर रंगीत साड्या या शालू आहेत.”
-
या दोन्ही साड्या या पाचवार होत्या. त्याची आम्ही नऊवारी साडी शिवायला दिली.
-
“याचा पदर लहान होता. पांढरी साडी शिवून आल्यानंतर त्याची ट्रायल झाली.”
-
‘खांद्यापासून कंबरेपर्यंत व्यवस्थित मोजमाप घेतलं आणि मग शालू घेऊन त्याचा पदर शिवण्यात आला.”
-
“याचा पदरही त्रिकोणी कापण्यात आला आहे. कारण पोटाकडे त्याचा जास्त भाग येऊ नये.”
-
“तसेच त्यांच्या ब्लाऊजवरही आई, बहिण, बायको, मुलगी असे लिहिण्यात आले आहे.”
-
“त्याबरोबरच मी या सर्व कलाकारांच्या साड्यांचे रंग पाठवून त्याच रंगाचे दागिनेही बनवून घेतले.”
-
“मी जेव्हा हे सर्व करत होते, तेव्हा माझ्याकडे फोटो दाखवण्यासाठी काहीही नव्हतं. काही स्केच काढलेले होते. त्यावर मला केदार शिंदेंनी करुया, असं सांगितले आणि म्हणूनच मी हे करु शकले”, असेही युगेशाने सांगितले.
Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं