-
बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर आज तिचा ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडमधली फिट अभिनेत्री भूमी पेडणेकर एकेकाळी तिच्या लठ्ठपणामुळे ट्रोल होत होती. ‘जोर लगा के हईशा’ या तिच्या पदार्पणाच्या चित्रपटात तिने एका लठ्ठ महिलेचीच भूमिका साकारली होती. परंतु नंतर तिने तिचं वजन कमी केलं. (PC – @bhumipednekar/insta)
-
भूमी पेडणेकरने तब्बल ३२ किलो वजन घटवलं आहे. अनेकांना वाटतं कमी आहार घेऊन अथवा उपाशी पोटी राहून तिने वजन कमी केलं असेल. परंतु हे खोटं असून भूमीने उत्तम डाएट प्लॅन आणि वर्काऊटद्वारे वजन कमी केलं आहे. (PC – @bhumipednekar/insta)
-
भूमीने स्वतः वजन कमी केलं असलं तरी ती नेहमी म्हणते की, आपलं जसं शरीर आहे त्यावर आपण प्रेम केलं पाहिजे. (PC – @bhumipednekar/insta)
-
भूमीने जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं तेव्हा तिचं वजन ९० किलो इतकं होतं. पहिल्या चित्रपटासाठी तिने ३० किलो वजन वाढवलं आणि नंतर कमी देखील केलं. (PC – @bhumipednekar/insta)
-
वजन कमी करण्यासाठी तिने उत्तम डाएट प्लॅन फॉलो केला होता. भूमीने सांगितलं की ती सकाळी रिकाम्या पोटी चहा पित नाही, ती दुधाबरोबर तीन बिस्कीटं खाते. (PC – @bhumipednekar/insta)
-
त्यानंतर भूमी नाश्ता करते. ज्यामध्ये ग्रिल्ड सँडविच खाते. ती खूप संतुलित डाएट करते. (PC – @bhumipednekar/insta)
-
वर्कआऊटमध्ये ती धावते तसेच स्ट्रेंथ ट्रेनिंग घेते. तसेच जिममध्ये नेहमीचा वर्कआऊट करते. (PC – @bhumipednekar/insta)

आता ऑफिसमध्ये पाणी पिण्याची पण भीती! पाहा Viral Video तील किळसवाणी घटना