-
दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा दणदणीत प्रतिसाद मिळत आहे.
-
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.
-
हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एका दिवसात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
-
या चित्रपटाने फक्त १७ दिवसांत ५० कोटींचा टप्पा पार केला होता.
-
आता या चित्रपटाने २० दिवसात किती कोटी कमावले, याची माहिती समोर आली आहे.
-
‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने पहिल्याच आठवड्याच्या अखेरीस १२.५० कोटी रुपयांची कमाई केली होती.
-
त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाच्या कमाईत दुप्पटीने वाढ झाली.
-
या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात तब्बल २४.८५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला.
-
यानतंर आता हा चित्रपट तिसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे.
-
या चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यात तब्बल ५७.१५ कोटींची कमाई केली आहे.
-
‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाचे बजेट फक्त ५ कोटी होते, अशी माहिती एका वेबसाईटने दिली होती.
-
मात्र बजेटच्या तुलनेत हा चित्रपट चार पटीने जास्त कमाई करताना दिसत आहे.
-
‘बाईपण भारी देवा’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहता हा चित्रपट ‘सैराट’ आणि ‘वेड’ या दोन्ही चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार असल्याचे बोललं जात आहे.
-
या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या मुख्य भूमिकेत आहेत.
-
या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या मुख्य भूमिकेत आहेत.

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य