-
‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेत झळकलेली अभिनेत्री स्वानंदी टिकेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
-
सध्या स्वानंदी टिकेकरच्या घरी साखरपुड्याची जय्यत तयारी सुरु आहे.
-
नुकतंच स्वानंदीचा मेहंदी सोहळा पार पडला. याचे काही फोटो तिने शेअर केले आहेत.
-
स्वानंदीने हातावरील मेहंदीची झलकही दाखवली आहे.
-
स्वानंदी ही प्रसिद्ध गायक आशिष कुलकर्णीबरोबर विवाहबंधनात अडकणार आहे.
-
यावेळी स्वानंदी आणि आशिषने छान ट्रेडिशनल आऊटफिट परिधान केला आहे.
-
स्वानंदीच्या मेहंदी सभारंभावेळी तिचे आई-बाबाही उपस्थित होते.
-
यावेळी तिच्या आईनेही हातावर मेहंदी काढली असून त्या फार आनंदात असल्याचे पाहायला मिळाले.
-
तिच्या मेहंदीसाठी जय्यत तयारीही करण्यात आली होती.
-
स्वानंदी टिकेकरने दोन दिवसांपूर्वी ‘आमचं ठरलं’ असं म्हणत जाहीरपणे प्रेमाची कबुली दिली होती.
-
त्यानंतर स्वानंदीने साखरपुड्यासाठी मेहंदीचे फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला होता.
-
दरम्यान स्वानंदीचा साखरपुडा कधी आहे, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
हाडं मोडली, ओठ चिरला अन्…; बॉलीवूड अभिनेत्रीचा भीषण अपघात, फोटो पाहून चाहते काळजीत