-
मराठी सिनेसृष्टीतीत सध्या लगीनघाई सुरु आहे. नुकतंच लोकप्रिय अभिनेत्री-गायिका स्वानंदी टिकेकर साखरपुडा पार पडला.
-
स्वानंदी टिकेकरने प्रसिद्ध गायक आशिष कुलकर्णीबरोबर रिलेशनशिपची घोषणा केली होती.
-
त्यानंतर लगेचच त्या दोघांनी साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला.
-
And We’re Engaged! असं कॅप्शन स्वानंदीने तिच्या साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले होते.
-
त्यानंतर आता स्वानंदी आणि आशिषच्या साखरपुड्याचे काही फोटो समोर आले आहेत.
-
यात स्वानंदी आणि आशिषने साखरपुड्यासाठी खास लूक केल्याचे पाहायला मिळत आहे.
-
यावेळी स्वानंदीने गुलाबी रंगाचा लेहंगा आणि आशिषने निळ्या रंगाचा कोट परिधान केला आहे.
-
यात ते दोघेही अंगठी घालताना दिसत आहे.
-
स्वानंदी आणि आशिषच्या हातातील अंगठीच्या डिझाईनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
-
स्वानंदी टिकेकर ही अभिनेते उदय टिकेकर आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर यांची मुलगी आहे.
-
स्वानंदीने ‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘दिल दोस्ती दोबारा’, ‘अस्सं माहेर नको गं बाई’ आणि ‘अगं अगं सुनबाई…’ या मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारली होती.
-
सोनी मराठीवरील ‘सिंगिंग स्टार’ या गायनाच्या कार्यक्रमाचे विजेतेपद स्वानंदीने पटकावले होते.
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”