-
‘बिग बॉस मराठी ४’ने अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादेला वेगळी ओळख मिळवून दिली.
-
तर आता नुकताच त्यांनी त्यांचा साखरपुडा उरकला. साध्या पद्धतीने त्यांचा साखरपुडा संपन्न झाला.
-
सोशल मीडियावरून त्यांनी त्यांच्या साखरपुड्याची बातमी सर्वांशी शेअर केली.
-
आता त्यांनी साखरपुड्यानंतचे त्यांचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये त्या दोघांच्या अंगठ्यांची झलक दिसत आहे.
-
प्रसादने अमृताला नाजूक अशी खड्यांची अंगठी घातली. तिची अंगठी सोन्याची असून त्यावर एक डायमंडचं एक नाजूक फुल आहे.
-
तर प्रसादची अंगठीही सोन्याची असून त्यावर मध्यभागी चार डायमंड आहेत.
-
या फोटोंमध्ये अमृताने काळ्या रंगाचा वन पीस आणि प्रसादने काळ्या रंगाचा शर्ट आणि त्यावर त्याच रंगाचा ब्लेझर परिधान केलेला दिसत आहे.
-
त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून त्यांचा हा अंदाज आवडल्याचं नेटकरी सांगत आहेत. ही दोघं यावर्षी १८ नोव्हेंबर रोजी विवाहबद्ध होतील.
Pakistan PM Shahbaj Sharif : “पहलगाम हल्ल्याप्रकरणी आम्ही तटस्थ चौकशीला तयार”; पाकिस्तानच्या पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया!