-
हॉलिवूड चित्रपट ‘ओपेनहायमर’ (Oppenheimer) सध्या खूप चर्चेत आहे. जगभरात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही मोठं यश मिळवलं आहे. भारतातही हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. भारतात या चित्रपटाची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. (Still From Film)
-
‘ओपेनहायमर’ने भारतात बक्कळ गल्ला जमवला आहे. या चित्रपटाचे देशभरातील अनेक शो हाऊसफुल्ल ठरले आहेत. (Still From Film)
-
ओपेनहायमर हा चित्रपट २०२३ मध्ये देशात सर्वात मोठी ओपनिंग करणारा (पहिल्या दिवसाची कमाई) हॉलिवूड चित्रपट ठरला आहे. (Still From Film)
-
जगातल्या दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक असलेल्या ख्रिस्तोफर नोलनची जादू भारतातही पाहायला मिळत आहे.
-
‘ओपेनहायमर’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी भारतात १४.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाने भारतात १७.२५ कोटी रुपयां चागल्ला जमावला. (Still From Film)
-
तीन दिवसांमध्ये या चित्रपटाने भारतात ५७.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. (Still From Film)
-
तीन दिवसात सर्वाधिक कमाई करण्याच्या बाबतीत ओपेनहायमर देशात सातव्या क्रमांकावरचा हॉलिवूड चित्रपट ठरला आहे. (Still From Film)
-
‘ओपेनहायमर’ने भारतात सध्या बॉक्स ऑफिसर प्रदर्शित झालेल्या टॉम क्रूझच्या ‘Mission: Impossible – Dead Reckoning Part One’ आणि कार्तिक आर्यनच्या ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटांना कमाईच्या बाबतीत मागे टाकलं आहे. (Still From Film)

शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?