-
अभिनेता रणदीप हुडाने ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटात विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारण्यासाठी तब्बल २६ किलो वजन कमी केलं होतं
-
शूटिंग संपेपर्यंत ४ महिने तो फक्त एक खजूर आणि एक ग्लास दूध प्यायचा, असा दावा चित्रपट निर्माते आनंद पंडित यांनी केला होता.
-
रणदीप हुडा हा एक हरहुन्नरी अभिनेता आहे. त्याने आजवर अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.
-
रणदीप हुडा वीर सावकरांच्या भूमिकेत दिसणार आहे.
-
मात्र रणदीप हुडाने आपण फक्त दूध आणि खजूर एवढ्याच डाएटवर होतो हा दावा खोडला आहे. यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. हे अजिबात फॉलो करू नका असंही रणदीपने म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने हे वक्तव्य केलं आहे.
-
चित्रपटाच्या प्रदीर्घ शेड्यूलमुळे मला जवळपास ७ महिने कमी वजनात राहावे लागले. त्या काळात माझे वजन ६२ किलो असेल. एवढ्या कमी वजनामुळे मला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रिकव्हरीत अडचणी येत आहेत. शिवाय सांधेदुखी आणि पचनाच्या समस्या होऊ लागल्या. त्यामुळे अशा डाएटचा सल्ला मी कुणालाही देणार नाही असंही रणदीपने सांगितलं.
-
मी वेगवेगळे डाएट फॉलो केले. माझी बहीण डॉ. अंजली हुड्डा इंटर्नल मेडिसीन स्पेशालिस्ट आहे. ती मला डाएटबद्दल सल्ला देत असते
-
खजूर आणि दुधाने वजन कमी होते, अशा चुकीच्या बातम्या पसरवल्या जात होत्या, त्या चुकीच्या आहेत. मी फक्त खजूरच खात नाही असंही रणदीपने स्पष्ट केलं
-
रणदीप हुडाने याआधीही सरबजीत या सिनेमासाठी वजन कमी केलं होतं.
