-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा दादूस म्हणजेच अरुण कदम.
-
अरुण कदम हे लवकरच आजोबा होणार आहेत.
-
काही दिवसांपूर्वी त्यांच्या लेकीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला.
-
त्यानंतर आता अरुण कदम यांची लेक सुकन्या कदमच्या मॅटर्निटी फोटोशूटचे काही फोटो समोर आले आहेत.
-
सुकन्या कदमने मॅटर्निटी फोटोशूटसाठी अगदी पारंपारिक साजश्रृंगार केला होता.
-
तिने नऊवारी साडी, गळ्यात डोरलं, पायात कोल्हापुरी चप्पल असा लूक मॅटर्निटी शूटसाठी केला होता.
-
तर तिचा नवरा सागर पोवाळे यानेही धोती, सदरा, त्यावर काळा कोट आणि टोपी असा लूक केल्याचे पाहायला मिळत आहे.
-
अरुण कदम यांची लेक सुकन्याचे फोटोशूट भर पावसात पार पडले.
-
त्यांचे हे फोटोशूट बांद्रा बँडस्टँड या ठिकाणी अगदी साधेपणाने करण्यात आले.
-
सुकन्या कदम आणि सागर यांचा विवाहसोहळा २०२१ मध्ये पार पडला.
-
सुकन्या ही कमर्शिअल आर्टिस्ट, ग्राफिक्स डिझायनर आहे. शिवाय ती भरतनाट्यमही शिकली आहे.
-
सुकन्याच्या पहिल्या बाळंतपणासाठी अरुण यांच्यासह त्यांची पत्नीही उत्सुक आहे.

Pahalgam Terror Attack Live Update: पाकिस्ताननं भारतासाठी हवाई हद्द बंद केली, पुढे काय? केंद्रीय मंत्री म्हणतात, “जर ही परिस्थिती वर्षभर राहिली…”