-
करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
-
‘रॉकी और रानी’मध्ये अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंह यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
-
नुकताच रणवीरने दीपिका पदुकोणसह ‘रॉकी और रानी’ चित्रपट पाहिला.
-
यावेळी दीपिका पदुकोणने परिधान केलेल्या डेनिम जॅकेटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
अभिनेत्रीच्या जॅकेटवर पुढच्या बाजूस RS (रणवीर सिंह) लोगो स्पष्टपणे दिसत होता.
-
नवऱ्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दीपिकाने हे जॅकेट परिधान केले होते.
-
दीपिकाच्या जॅकेटच्या मागील बाजूस रणवीर सिंहचा रंगीबेरंगी फोटो पाहायला मिळाला.
-
दीपिकाच्या या हटके लूकची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. नेटकऱ्यांनी तिच्या या जॅकेटचे कौतुक केले आहे.
-
दरम्यान, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.
Devendra Fadnavis : लाडक्या बहिणींना २१०० रुपये कुठल्या महिन्यापासून मिळणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही…”