-
अलीकडेच अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि शुभांगी गोखले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची नवी मालिका स्टार प्रवाहवर सुरु होणार असल्याचं सांगितलं होतं.
-
ही नवी मालिका नेमकी कोणती? मालिकेची गोष्ट काय असेल? कोणते कलाकार असतील? याविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती.
-
ज्या मालिकेविषयी इतकं भरभरुन बोललं जात आहे ती मालिका ४ सप्टेंबरपासून रात्री ८ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
‘प्रेमाची गोष्ट’ असं या मालिकेचं नाव आहे.
-
स्टार प्रवाहच्या प्रत्येक मालिकेतून नातेसंबंधांवर भाष्य केलं जातं.
-
‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका देखिल नात्यांची गुंफण असेल.
-
चिमुकल्या सईवरच्या प्रेमापोटी दोन विभिन्न स्वभावाचे मुक्ता आणि सागर कसे एकत्र येतात आणि त्यांच्यातलं प्रेम कसं बहरत जातं हे सांगणारी सुंदर, तरल कथा म्हणजे ‘प्रेमाची गोष्ट’.
-
‘प्रेमाची गोष्ट’ या नव्या मालिकेत प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान मुक्ता गोखले ही भूमिका साकारणार असून अभिनेता राज हंचनाळे सागर कोळीच्या भूमिकेत दिसेल.
-
याबरोबरच शुभांगी गोखले, संजीवनी जाधव, अपूर्वा नेमळेकर, संजय शेजवळ, योगेश केळकर, उमेश घाडगे, सुप्रीत कदम आणि बाल कलाकार इरा पारवडे अशी दिग्गज कलाकारांची फौज मालिकेतून भेटीला येईल.
-
राहुल लिंगायत या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत.
-
या नव्या मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘प्रेमाची गोष्ट’ या नावातच सगळं काही येतं.
-
हळुवार, संवेदनशील आणि पुन्हा एकदा आजच्या पीढीची गोष्ट घेऊन स्टार प्रवाह वाहिनी रसिकांना दर्जेदार करमणूक देण्यास सज्ज आहे.
-
दिग्गज कलाकार आणि सक्षम लेखन, दिग्दर्शन असलेली ही प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांना नक्की आवडेल.
-
मुक्ता गोखले या व्यक्तिरेखेविषयी सांगताना तेजश्री प्रधान म्हणाली, स्टार प्रवाह वाहिनीबरोबर जवळपास १३ वर्षांनी पुन्हा एकदा काम करताना अतिशय आनंद होतोय.
-
घराघरातील गृहिणी समरसून मालिका पहात असतात.
-
त्यामुळे एक कलाकार म्हणून कोणतंही पात्र साकारताना सामाजिक जबाबदारीचं भान राखण्याचा मी प्रयत्न करते.
-
मुक्ता हे पात्रं प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. मुक्ता साकारतान माझ्यासमोर मुलगी, सून आणि आईच्या भूमिकेतला समंजसपणा जपण्याचं आव्हान असेल.
-
मुक्ताच्या आईची म्हणजेच माधवी गोखले ही भूमिका साकारणार आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले, या भूमिकेविषयी सांगताना शुभांगी ताई म्हणाल्या स्टार प्रवाहबरोबर खूप जुनं नातं आहे.
-
‘अग्निहोत्र’, ‘अग्निहोत्र २’ आणि आता ‘प्रेमाची गोष्ट’. मालिकेची टीम खूप उत्तम आहे.
-
या मालिकेचं लेखन हे बलस्थान म्हणता येईल. माधवी या पात्राच्या निमित्ताने साधेपणातलं सौंदर्य जपायला मिळेल.
-
(सर्व फोटो सौजन्य : तेजश्री प्रधान आणि स्टार प्रवाह / इन्स्टाग्राम)
अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा, अजित पवारांची दोन वाक्यात प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले…