-
ज्येष्ठ मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.
-
सोशल मीडियावर खूप घाणेरड्या पातळीवर टीका केली जाते, असं ते म्हणाले आहेत.
-
फालतूतला फालतू माणूस, ज्याची लायकी नाही, ज्याने दोन ओळी कधी आयुष्यात वाचल्या नाहीत तो उठतो आणि ट्रोल करतो. – शरद पोंक्षे
-
त्याला काही निती-नियम नाही, त्याला काही संहिता नाही, त्याला कुठले कायदे-कानून नाही. – शरद पोंक्षे
-
खोट्या नावांनी अकाउंट्स उघडतात, भन्नाटच काहीतरी नावाने अकाउंट्स असतात. – शरद पोंक्षे
-
कोणीही कोणाला शिव्या देतं आपण बघायला गेलो तर प्रोफाईल लॉक असते.- शरद पोंक्षे
-
मला एखाद्याची मतं नाही पटत तर ठिक आहे. आपल्याला जन्मदात्या आई-वडिलांचं पटत नाही. नवरा बायकोची मतं पटत नाही, मग ती चर्चेत नाही घ्यायची, सोडून द्यायची. – शरद पोंक्षे
-
मी नथुराम गोडसेचा रोल केल्यामुळे या २० वर्षांत इतक्या घाणेरड्या पद्धतीने मला ट्रोल केलं गेलं. इतकं घाण-घाण बोललं गेलं. – शरद पोंक्षे
-
मीही सामान्य माणूसच आहे, त्यामुळे सुरुवातीला त्रास व्हायचा. पण नंतर मी ते ओव्हरकम करायला शिकलो. – शरद पोंक्षे
-
मग विचार करू लागलो की ट्रोल करणाऱ्यांची बुद्धीमत्ताच तेवढी आहे, त्याला माहीत नाही शरद पोंक्षे तर तो काय करणार. – शरद पोंक्षे
-
ट्रोलिंबद्दल बोलताना त्यांनी त्यांची मुलगी परदेशात शिकायला गेल्यानंतर झालेल्या टीकेला उत्तर दिलं.
-
टीका करतात त्यांना हे माहीत नाही की गांधीजी, आंबेडकर, सावरकरदेखील परदेशातच शिकायला गेले होते.- शरद पोंक्षे
-
परदेशात शिकायला जाणं काही पाप नाही. चांगलं शिक्षण हवं असेल आणि जर ते आपल्याकडे नसेल तर जाईल ना माणूस. त्यात काय प्रॉब्लेम आहे. – शरद पोंक्षे
-
आता तर सगळं ग्लोबल झालंय, जग जवळ आलंय, असंही शरद पोंक्षे म्हणाले.
-
(सर्व फोटो – शरद पोंक्षे यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून साभार)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख