-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना दिसत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री गिरीजा प्रभू ही ‘गौरी शिर्केपाटील’ची भूमिका साकारत आहे.
-
श्रावणात केले जाणारे मंगळागौरीचे व्रत म्हणजे नवविवाहितेसाठी उत्साहाची, आनंदाची पर्वणीच असते.
-
श्रावण हा धार्मिक व्रत-वैकल्यांचा पवित्र महिना आहे.
-
नुकतीच गिरीजाने मंगळागौरीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
-
या मंगळागौरीच्या कार्यक्रमासाठी गिरीजाने मराठमोळा लूक केला होता.
-
गिरीजाने हिरव्या रंगाची सुंदर नऊवारी साडी नेसली होती.
-
हिरव्या साडीवर गिरीजाने पिवळ्या रंगाचा डिझायनर ब्लाऊज परिधान केला होता.
-
नऊवारी साडीतील लूकवर गिरीजाने पारंपरिक दागिन्यांचा साज केला होता.
-
‘चला खेळूया मंगळागौर…’ असं कॅप्शन गिरीजाने फोटोंना दिले आहे.
-
मंगळागौरीच्या कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडीओ गिरीजाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
मंगळागौर या व्रताची परंपरा महाराष्ट्रासह भारताच्या अनेक भागांत आढळते.
-
सध्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेचे कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गिरीजा प्रभू / इन्स्टाग्राम)
४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी