-
सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याने मनोरंजनसृष्टीत खळबळ उडाली आहे.
-
देसाई यांनी त्यांच्या कर्जतच्या त्यांच्या एन. डी. स्टुडिओमध्ये गळफास घेत जीवन संपवले.
-
देसाईच्या यांच्या आत्महत्येनंतर मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.
-
मराठीसह अनेक हिंदी कलाकारांनी त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे.
-
त्यांच्या आत्महत्येमागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
-
चंद्रकांत देसाई यांचा जन्म १९६५ साली झाला.
-
देसाई यांनी ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स’मधून आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं होतं.
-
नितीन देसाई यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटांसाठी कलादिग्दर्शनाचं काम केलं आहे.
-
लगान, जोधा- अकबर, देवदास सारख्या सुपरहिट चित्रपटांसाठी त्यांनी भव्य सेट उभारण्याच काम केलं होतं.
-
जवळपास १०० पेक्षा जास्त चित्रपटांसाठी त्यांनी कलादिग्दर्शक म्हणून काम केलं आहे.
-
या कामासाठी त्यांना ४ वेळा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.
-
एवढंच नाही तर भारतातील सगळ्या मोठा चित्रपट सेट तयार करण्याचा रेकॉर्डही त्यांच्या नवावर आहे.
-
अमिताभ बच्चन यांचा कौन बनेगा करोडपतीचा सेटही चंद्रकांत देसाई यांनीच उभारला होता.
-
२००५ साली त्यांनी कर्जतमध्ये एन. डी. स्टुडिओची स्थापना केली होती.
-
एन. डी. स्टुडिओच्या भव्यदिव्य आवारात ही ‘फिल्मी दुनिया’ हे चित्रपट थिमवर आधारीत पार्कही येथे आहे.
-
या ठिकाणी अनेक सुप्रसिद्ध हिंदी आणि मराठी सिनेमाचे सेट आहेत.
-
रामोजी फिल्म सिटीइतकाच नितीन देसाई यांचा एन. डी. स्टुडिओ असल्याचे सांगण्यात येते.
-
फोटो (चंद्रकांत देसाई इन्स्टाग्राम)

Marathi Language Controversy : “मराठी गया तेल लगाने, तुम…”; मुंबईत एल अँड टीच्या सुरक्षा रक्षकाची मुजोरी, मनसेने ‘असा’ शिकवला धडा