-
प्रियांका चोप्रा जगभरात प्रसिद्ध आहे. तिने बॉलिवूड, हॉलिवूडमध्ये दमदार कामं केली आहेत. त्यामुळे तिची संपत्ती किती असा प्रश्न तिच्या चाहत्यांना नेहमीच पडतो.
-
बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास केलेली अभिनेत्री प्रियांका चोप्राला आज कोणात्याही नव्या परिचयाची गरज नाही. प्रियांका चोप्राने २००० साली ‘थमिजन’ या तमिळ चित्रपटातून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. (फोटो: प्रियांका चोप्रा/इन्स्टा)
-
मिस वर्ल्डचा किताब पटकावणारी ही मुलगी निक जोनाससोबत लग्न करून आता अमेरिकेत स्थायिक झाली आहे. प्रियांका आज नाव आणि प्रसिद्धीसोबतच कोट्यवधी रुपयांची मालक आहे.
-
फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, प्रियांका चोप्रा बॉलिवूडमधील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्रीची एकूण संपत्ती ६२० कोटी आहे.
-
रिपोर्ट्सनुसार, प्रियांका महिन्याला १.५ कोटी रुपये कमावते.
-
प्रियांका चोप्रा एका बॉलिवूड चित्रपटासाठी १२ कोटी रुपये मानधन घेते. प्रियांका चोप्रा एका स्टेज शोसाठी ५ कोटी रुपये मानधन घेते. यासोबतच इन्स्टाग्रामवर प्रायोजित पोस्टसाठी (जाहिरात) तब्बल १.८० कोटी रुपये घेते.
-
प्रियांकाचे अमेरिकेत २३८ कोटींचे घर आहे. याशिवाय तिची मुंबईतही दोन घरे आहेत. तिची गोव्यातही सुमारे २० कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
-
प्रियांका चोप्राकडेही प्रायव्हेट जेट आहे. तिला महागड्या गाड्यांचाही शौक आहे.
-
प्रियांका चोप्राकडे मर्सिडीज बेंझ एस क्लास, पोर्श, मर्सिडीज बेंझ ई क्लास, मर्सिडीज-मेबॅक एस ६५०, ऑडी क्यू ७ आणि बीएमडब्ल्यू ५ सारख्या कार आहेत. २.५ कोटी रुपयांची रोल्स रॉयस लक्झरी कार खरेदी करणारी प्रियंका ही पहिली बॉलिवूड अभिनेत्री आहे. (फोटो: प्रियांका चोप्रा/इन्स्टा)

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई