-
केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आतापर्यंत ७० कोटींहून अधिक कमाई केली आहे.
-
‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचे सुंदर कथानक वैशाली नाईक हिने लिहिले आहे.
-
चित्रपटाची कथा कशी सुचली? याबद्दल वैशाली नाईकने अलीकडेच खुलासा केला आहे.
-
वैशाली म्हणाली, “ही कथा मी माझी आई सेवानिवृत्त झाल्यावर २०१८ मध्ये लिहिली होती. माझ्या आईच्या सहा बहिणी आहेत त्यामुळे मला ही कथा सुचली. लहानपणापासून मी त्यांचे असंख्य किस्से ऐकले होते.”
-
“मी गिरगावची असल्याने मला परंपरा, सण याविषयी माहिती होते. आई सेवानिवृत्त झाल्यावर तिच्यासमोर प्रश्न होता आता पुढे करायचे?”
-
“आईसारख्या त्या विशिष्ट वयातील बायकांना एका काळानंतर वाटू लागते आता कोणालाच आपली गरज नाही.”
-
“आईमुळे या सगळ्या गोष्टी कळत गेल्या आणि माझ्या जीवनप्रवासात मला ‘बाईपण भारी देवा’ची कथा सुचली.” असे वैशालीने सांगितले.
-
ओमकार, केतन, निकिता या माझ्या टीमबरोबर बसून ही कथा पूर्ण केल्याचे वैशालीने नमूद केले.
-
प्रत्यक्षात आलेल्या अनुभवांचे लेखन केल्यामुळे हा चित्रपट सर्वांना जवळचा वाटला असेही वैशाली म्हणाली. दरम्यान, या सुंदर कथेसाठी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेत्रींनीही वैशालीचे विशेष कौतुक केले आहे.

Shiv Jayanti 2025 Wishes : शिवजयंतीच्या द्या प्रियजनांना खास शुभेच्छा; वाचा, एकापेक्षा एक सुंदर व हटके मेसेज