-
अभिनेते धर्मेंद्र हे ८७ वर्षांचे आहेत. सध्या बॉक्स ऑफिसवर चर्चेत असलेल्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या सिनेमातही त्यांनी भूमिका केली आहे.
-
धर्मेंद्र यांनी आजवर अनेक सिनेमांमध्ये कामं केली आहेत, ते सिनेमा आजही लोकांना भावतात.
-
धर्मेंद्र हे सध्या त्यांचा बराचसा वेळ हा त्यांच्या फर्म हाऊसवर घालवतात.
-
तुम्हाला ठाऊक आहे का धर्मेंद्र यांना त्यांच्या पहिल्या सिनेमासाठी किती मानधन दिलं गेलं होतं?
-
धर्मेंद्र यांनी डान्स दिवाने या कार्यक्रमात सांगितलं होतं की त्यांना दिल भी तेरा हम भी तेरे या सिनेमासाठी साईन करण्यात आलं. त्यावेळी मला ५१ रुपये मानधन मिळालं होतं. ते ५१ रुपये हे मी माझ्यासाठी लकी मानतो असंही धर्मेंद्र म्हणाले होते.
-
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची जोडी रुपरेी पडद्यावरही हिट ठरली आणि खऱ्या खुऱ्या आयुष्यातही.
-
धर्मेंद्र आणि अमिताभ यांची जय विरू ही शोले सिनेमातली जोडीही प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे.
-
धर्मेंद्र यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ ला लुधियानातील साहनेवाल या ठिकाणी झाला. त्यांचं खरं नाव धर्म सिंह देओल असं आहे.
-
धर्मेंद्र हे फिल्मफेअर मॅगझिनच्या टॅलेंट अवॉर्डचे विजेते होते. त्यानंतर ते पंजाबहून मुंबईत आले. त्यांना हा पुरस्कार मिळाल्यानंतर सिनेमात काम मिळेल असं सांगण्यात आलं होतं मात्र तो चित्रपट कधी तयारच झाला नाही.
-
१९६० मध्ये धर्मेंद्र यांनी दिल भी तेरा हम भी तेरे या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. १९६१ ते ६७ या कालावधीत त्यांनी अनेक सिनेमांमध्ये सह कलाकार म्हणून काम केलं.
-
धर्मेंद्र यांचं मेरा नाम जोकर या सिनेमातलं छायाचित्र
-
१९६६ मध्ये फूल और पत्थर या सिनेमात धर्मेंद्र यांनी हिरो म्हणून भूमिका साकारली.
-
धर्मेंद्र यांच्या अॅक्शन पटांमुळे त्यांना हिंदी सिनेसृष्टीचा हीमॅन असं म्हटलं जाऊ लागलं. ते बिरुद त्यांच्या नावापुढे चिकटलं ते कायमचंच
-
धर्मेंद्र यांची अॅक्शन, त्यांचा अभिनय हे लोक आजही विसरलेले नाहीत. त्यांचे अनेक संवाद आजही लोकांच्या मनात घर करुन राहिले आहेत.

सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या भोसलेला अखेर अटक; उत्तर प्रेदशातून घेतलं ताब्यात