-
बॉलीवूडमधील ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी २ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. ते कर्जामुळे आर्थिक अडचणीत होते आणि त्या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती.
-
या संपूर्ण प्रकरणावर पहिल्यांदाच नितीन देसाई यांची मुलगी मानसीने कुटुंबियांची बाजू मांडली आहे. तिने एएनआयला दिलेल्या मुलाखतीत संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.
-
माझ्या वडिलांवर १८१ कोटी रुपयांचं कर्ज होतं. माझ्या वडिलांचा कधीच, कुणालाही फसवण्याचा हेतू नव्हता. माझ्या बाबांनी खूप मेहनत करून नाव कमावलं होतं- मानसी देसाई
-
मी मानसी चंद्रकांत देसाई, ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची मोठी मुलगी. मी माझी आई आणि कुटुंबातर्फे हे स्टेटमेंट देत आहे की माझे बाबा नितीन चंद्रकांत देसाई आम्हाला २ ऑगस्ट २०२३ रोजी सोडून गेले- मानसी देसाई
-
त्यानंतर माध्यमांमध्ये त्यांच्याबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे. हे स्टेटमेंट देण्याचा हाच हेतू आहे की ही दुःखद घटना घडल्यानंतर त्यांच्याबद्दल कर्ज बुडवण्याच्या बातम्या येत आहेत- मानसी देसाई
-
आम्ही बाबांची बाजू आणि त्यांच्याबरोबर जे घडलं तेच माध्यमांना सांगायचा प्रयत्न करत आहोत- मानसी देसाई
-
माझ्या वडिलांवर १८१ कोटी रुपयांचं कर्ज होतं, त्यापैकी ८६.३ कोटी रुपयांची परतफेड आम्ही फेब्रुवारी २०२० पर्यंत केली होती. नंतर करोना आल्याने पूर्ण जग थांबलं, बॉलीवूडलाही त्याचा फटका बसला – मानसी देसाई
-
बाबाकडे काम नव्हतं म्हणून स्टुडिओ बंद करावा लागला, त्यामुळे पेमेंट्स देण्यात उशीर झाला, नियमित होऊ शकले नाहीत- मानसी देसाई
-
त्याआधी लोन देणाऱ्या कंपनीने आमच्याकडून सहा महिन्यांचे अॅडव्हान्स पेमेंट मागितले होते- मानसी देसाई
-
त्यावेळी माझ्या बाबांनी पवईतील ऑफिस विकून त्यांची मागणी पूर्ण केली होती. त्यानंतरही कुणालाच फसवायचा बाबांचा हेतू नव्हता- मानसी देसाई
-
त्यांनी गेली दोन वर्षे लोन देणाऱ्या कंपनीबरोबर मीटिंग्स करून लोन सेटलमेंट करण्यासाठी किंवा रिस्ट्रक्चर करण्यासाठी खूप प्रयत्न केले, जेणेकरून ते कर्ज फेडू शकतील- मानसी देसाई
-
कंपनीने त्यांना आश्वासनं दिली की आपण सगळं हँडल करू आणि ते कर्ज फेडण्यात त्यांची मदत करतील. पण दुसरीकडे त्यांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली- मानसी देसाई
-
गुंतवणूकदार बाबांची मदत करायला तयार होते. पण कंपनीने त्यांना मदत करू दिली नाही- मानसी देसाई
-
माझी सगळ्यांना हीच विनंती आहे की बाबांबद्दल कोणत्याही खोट्या बातम्या किंवा चुकीच्या बातम्या पसरवल्या जाऊ नये. माझ्या वडिलांनी खूप मेहनत करून नाव कमावलं होतं, ते मातीत मिसळू नका – मानसी देसाई
-
यावेळी तिने राज्य सरकारला या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली. तसेच तिच्या वडिलांच्या शेवटच्या इच्छेप्रमाणे त्यांचा स्टुडिओ सरकारने ताब्यात घ्यावा आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”