-
अभिनेत्री सुप्रिया पाठारे या मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. आता त्या ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
-
त्यांचा मुलगा अभिनय क्षेत्रात नसला तरीही खूप चर्चेत असतो.
-
कालच त्यांच्या मुलाच्या नवीन हॉटेलचं उद्घाटन झालं.
-
सुप्रिया पाठारे त्यांच्या कामाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची माहिती सोशल मीडियावरून चाहत्यांची शेअर करत असतात.
-
नुकतंच त्यांनी एक पोस्ट शेअर करत त्यांचा मुलगा आता लवकरच नवीन हॉटेल सुरू करणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती.
-
सुप्रिया यांचा मुलगा मिहिर पाठारे हा प्रोफशनने शेफ आहे. परदेशात लोकप्रिय असलेली फूट ट्रकची संकल्पना त्याने ठाण्यात सुरू केली. ‘मharaj’ असं त्या फूट ट्रकच नाव आहे.
-
तर आता त्याने ‘मharaj’ पावभाजी आणि फास्ट फूट कॉर्नर सुरू केला आहे. हे त्याचं नवीन हॉटेल ठाण्यात आहे.
-
काल या हॉटेलच्या उद्घाटनाला मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली.
-
पाव भाजी या हॉटेलची खासियत आहे.
-
तर याचबरोबर वेगवेगळे तंदूर असलेले पदार्थही या हॉटेलमध्ये मिळणार आहेत.
-
याचबरोबर वेगवेगळी सरबतंही उपलब्ध आहेत.
-
या हॉटेलमध्ये आलेल्या खवय्यांना बसण्याचीही उत्तम सोय केलेली आहे. या हॉटेलचे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मिडियावर व्हायरल होत असून आता सोशल मीडियावरून मिहिर आणि सुप्रिया पाठारे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”