-
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री इलियाना डिक्रुझ लग्न न करताच आई झाली आहे.
-
इलियानाने मंगळवारी १ ऑगस्ट २०२३ रोजी बाळाला जन्म दिला.
-
तिने सोशल मीडियावर याबद्दल पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही गुडन्यूज दिली.
-
इलियानाने १८ एप्रिल रोजी तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती.
-
तिने बेबी बंप दाखवत एक फोटो शेअर केला होता.
-
त्यानंतर आता शनिवारी ५ ऑगस्टला तिने एक पोस्ट शेअर करत बाळाला जन्म दिल्याचे सांगितले.
-
तिने त्याचे नाव ‘कोआ फिनिक्स डोलन’ असे ठेवले आहे.
-
आता तिच्या लेकाच्या नावाचा अर्थ समोर आला आहे.
-
पंडित जगन्नाथ गुरु यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या माहितीनुसार, “कोआ फिनिक्स डोलन हे एक सुंदर आणि प्रभावी नाव आहे.”
-
“कोआ या नावाचा अर्थ योद्धा असा होतो.”
-
“तर फिनिक्स हा शब्द पुनर्जन्म आणि नूतनीकरणाचे प्रतिक आहे.”
-
“कोआ फिनिक्स हे नाव असलेलं मुलं हे खूप मजबूत आणि धैर्यवान आहे.”
-
“या नावाच्या व्यक्ती कधीही आव्हानांना सामोरे जाण्यास घाबरत नाहीत.”
-
“फिनिक्स या नावाचा संबंध कलेशीही जोडला जातो.”
-
“या नावाची मुलं एक प्रतिभाशाली कलाकार किंवा संगीतकार असतात.”
-
दरम्यान इलियानाने तिच्या बाळाची गुडन्यूज शेअर करताना त्याला खास कॅप्शन दिले होते.
-
“आमच्या लाडक्या मुलाचे या जगात स्वागत करताना आम्हाला किती आनंद होतोय, हे आम्ही शब्दात मांडू शकत नाही. मन आनंदाने भरून आलंय”, असे म्हटले होते.
-
सर्व फोटो – इलियाना डिक्रूझ/ इन्स्टाग्राम
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल