-
अभिनेते – दिग्दर्शक प्रवीण तरडे त्यांच्या बिनधास्त, बेधडक स्वभावामुळे कायम चर्चेत असतात.
-
प्रवीण तरडे आणि उपेंद्र लिमये यांनी नुकतीच बोल भिडूच्या दिलखुलास गप्पा कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी प्रवीण तरडेंनी चित्रपटसृष्टीबद्दल अनेक खुलासे केले आहेत.
-
सलमान खान, मधुर भांडारकर, संजय लीला भन्साळी यांचे चित्रपट एवढे सुंदर दिसतात कारण, यामागे एका मराठी माणसाचे योगदान असल्याचे प्रवीण तरडे यांनी सांगितले.
-
हा मराठी माणूस दुसरा-तिसरा कोणीही नसून सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि छायाचित्रणकार महेश लिमये आहेत.
-
महेश लिमये यांनी प्रवीण तरडे यांच्या ‘रेगे’, ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटांची DOP म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
-
महेश लिमयेंमुळे प्रवीण तरडे आणि सलमान खान यांची भेट झाली होती.
-
“हिंदी चित्रपटसृष्टीत माझी सर्वांशी ओळख झाल्याचे संपूर्ण योगदान महेश लिमये यांचे आहे.” असे प्रवीण तरडे यांनी सांगितले.
-
“‘मुळशी पॅटर्न’ माझ्या प्रचंड जवळचा चित्रपट आहे आणि कायम राहिल. त्यामुळे त्या चित्रपटासाठी खिशात पैसे नसतानाही मी महेश लिमयेला माझ्याबरोबर काम करशील का? असे विचारले होते. तो सर्वांना देवा अशी हाक मारतो, म्हणून मी पण त्याला देवा म्हणतो.” असा खुलासा प्रवीण तरडे यांनी या मुलाखतीत केला.
-
‘यलो’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘दबंग’, ‘हॅपी एन्डिंग’, ‘फॅमिली कट्टा’, ‘दबंग ३’ अशा प्रसिद्ध चित्रपटांसाठी महेश लिमये यांनी काम पाहिले आहे.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”