-
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे.
-
‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली.
-
प्राजक्ता माळी आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे.
-
यानिमित्ताने अनेक कलाकार, तिचे मित्र-मंडळी तिला शुभेच्छा देताना दिसत आहेत.
-
गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता माळी लग्न कधी करणार? असा प्रश्न तिला सातत्याने विचारला जात आहे.
-
काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत प्राजक्ता माळीने लग्नाची अट सांगितली होती.
-
प्राजक्ता माळीने दोन वर्षांपूर्वी एक मुलाखत दिली.
-
या मुलाखतीत प्राजक्ताने तिच्या लग्नाबद्दल काही खास गोष्टी शेअर केल्या होत्या.
-
यावेळी तिने “मी लग्न करायला तयार आहे”, असेही म्हटले होते.
-
“मात्र माझी एक अट आहे”, असेही तिने सांगितले होते.
-
“माझ्या कुटुंबाने माझ्या लग्नाची तयारी केली आहे.”
-
“पण अजूनही नवरदेव भेटणं बाकी आहे.”
-
“माझ्या लग्नासाठी आईने दागिन्यांची खरेदी वैगरेही सुरु केली आहे.”
-
“मला नवरा मुलगा मिळाला की मी लग्न करेन. पण केव्हा याची माहिती नाही.”
-
“मला निर्व्यसनी मुलगा हवा आहे, हीच माझी पहिली अपेक्षा आहे.”
-
“माझा होणारा नवरा हा निर्व्यसनी असावा, हीच माझी अट आहे”, असे तिने यावेळी म्हटले होते.
-
दरम्यान प्राजक्ता लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे.
-
मात्र याचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

Shiv Jayanti 2025 Wishes : शिवजयंतीच्या द्या प्रियजनांना खास शुभेच्छा; वाचा, एकापेक्षा एक सुंदर व हटके मेसेज