-
मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. तिचा आज वाढदिवस आहे.
-
ती तिच्या कामाबरोबरच तिच्या फिटनेसमुळेही सर्वांचं लक्ष वेधून घेत असते.
-
आज तिच्या वाढदिवशी आपण तिचं फिटनेस सिक्रेट जाणून घेऊया.
-
काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ती स्वतःला कशी तंदुरुस्त ठेवते आणि त्यासाठी काय काय करते हे तिने सांगितलं होतं.
-
प्राजक्ता पारंपारिक व्यायाम पद्धती फॉलो करते. याचबरोबर ती योगा आणि आहार यांना समान महत्त्व देते.
-
अष्टांग योगा केल्याने चेहऱ्यावरची त्वचा नितळ होणं, आपला शरीर फिट ठेवणं, मनाला आणि शरीराला अंतर्बाह्य संतुलित करणं हे शक्य होतं असं तिने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.
-
प्राजक्ता अष्टांग योगा करते आणि याचे अनेक व्हिडीओ तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले होते.
-
व्यायामाबरोबरच आपण करत असलेला आहारही तितकाच महत्त्वाचा आहे असं प्राजक्ता मानते.
-
ती तिच्या आहारात सकस अन्नाचा समावेश करते. ती सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी पिते, त्यानंतर एक फळ खाते आणि मग दोन तासांनी पोटभर नाश्ता करते.
-
दुपारच्या जेवणामध्ये येतील एक-दोन पोळ्या, पालेभाजी वरण-भात, कडधान्य यांचा समावेश करते.
-
प्राजक्ता चहाप्रेमी आहे. पण ती चहामध्ये साखरेच्या ऐवजी गूळ घालते.
-
असा आहार आणि व्यायाम फॉलो करत प्राजक्ता स्वतःला नेहमी निरोगी आणि फिट ठेवते

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल